विधानसभेला राष्ट्रवादी किती जागांवर लढणार? प्रफुल पटेल यांनी स्पष्टच सांगितले…

Praful Patel On Vidhansabha | लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकींच्या तयारीला पक्षांनी सुरुवात केली आहे. महायुतीला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत फटका बसला. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागांपैकी केवळ एका जागेवर यश मिळवता आले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकांदरम्यान जागावाटपावरून रस्सीखेच झाल्याचे पाहायला मिळाले. यातच आता आगामी विधानसभेच्या जागावाटपावरुन महायुतीतमध्ये खलबतं सुरू होणार आहेत. गोंदियामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत प्रफुल पटेल यांनी 80 ते 90 जागांवर दावा केला आहे. यापूर्वी छगन भुजबळ यांनी देखील 80 जागांवर दावा केला होता.
प्रफुल पटेल यांना जागावाटपासंदर्भात म्हंटले की, “जुन्या राष्ट्रवादी पक्षाकडून आमच्याकडे एकूण 57 आमदार होते. ही गोष्ट लक्षात घेता आम्ही विधानसभेत 85 ते 90 जागा मागणार आहोत.” त्यामुळे, महायुतीत राष्ट्रवादीकडून थेट 85 ते 90 जागांवर दावा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी त्यांनी मंत्रीपदाबाबत देखील भाष्य केले. “राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केंद्रात मंत्रीपद मिळणार असेल तर ते मलाच मिळेल”, असा दावा प्रफुल्ल पटेलांनी केला आहे. Praful Patel On Vidhansabha |
मंत्री पद मलाच मिळणार
राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी संधी देण्यात आली. त्यामुळे, सुनेत्रा पवार यांना राज्यमंत्रीपद देण्यात येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय होईल. राष्ट्रवादीच्या कोट्यात जर कॅबिनेट मंत्री आलं तर ते मलाच मिळणार असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एनडीएमागे राहण्याचे कारण म्हणजे विरोधकांनी चुकीचा प्रचार केला, त्यामुळे अनेक ठिकाणी आम्ही मागे राहिलो, अशी खंतही प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकांपूर्वी जागावाटपातही रस्सीखेच
दरम्यान, लोकसभा निवडणुकांपूर्वी जागावाटपातही चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. सातारा आणि नाशिकच्या जागेवरुन वाद रंगला होता, त्यामुळे नाशिकची जागा जाहीर करण्यास महायुतीला उशीर झाला. याचाच फटका नाशिकमध्ये महायुतीला बसला, असेही म्हंटले जात आहे. Praful Patel On Vidhansabha |
हेही वाचा:





