Manoj Jarange : “केव्हापर्यंत भाजपची री ओढणार? फडणवीस तुम्हाला… “; राज ठाकरेंच्या त्या विधानानंतर मनोज जरांगेंची बोचरी टीका

Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आणि सगेसोयऱ्यांचा निकष लावून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा समाजाचे प्रणेते मनोज जरांगे २९ अॅागस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून आजही त्यांचे उपोषण सुरूच राहणार आहे. त्यामुळे जरांगे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. उपोषणाचा तिसरा दिवस असून गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नाचा कणही नसल्याने त्यांची प्रकृती खालवयास सुरूवात झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मुद्यावर भाष्य करताना मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबत सर्व गोष्टींची उत्तरं एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मनोज जरांगे परत का आले याचंही उत्तर एकनाथ शिंदेंना जाऊन विचारा, असं वक्तव्य यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याला आता जरांगेंनी जोरदार प्रत्युत्तर देत राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
केव्हापर्यंत भाजपची री ओढणार.
तुम्हाला आम्ही काही विचारलं का? मग तुम्ही आम्हाला का सल्ला देताय, असा थेट सवाल जरांगेंनी राज ठाकरेंना केला आहे. तुम्ही भाजपकडे गेलात, आता पाठिंबा काढून घेतला. आम्ही 11 आमदार दिलेत तेव्हा आम्ही म्हटलं का बस्स झालं मराठवाड्यात कशाला येता? असा खोचक प्रश्न जरांगेंनी उपस्थित केला आहे.
केव्हापर्यंत भाजपची री ओढणार. स्वतः ठाकरे ब्रँडचं अस्तित्व खराब करून घेताय. स्वतःचं पोरगं निवडणुकीत पडलं. तुम्ही हुशार राजकारणी, डोक्याने वागलं पाहिजे, नाही तर मुख्यमंत्री फडणवीस तुम्हाला संपवून टाकतील, अशी जहरी टीका मनोज जरांगेंनी राज ठाकरेंवर केली आहे.
राज ठाकरेंना लक्ष
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र आल्याने याची चर्चा राजकीय वर्तुळात प्रचंड झाली. मुंबईतील वरळी येथील डोम सभागृहात मोठ्या थाटात जोरदार शक्तीप्रदर्शन करत राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू तब्बल १८ वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. त्यामुळे आता शिवसेना उबाठा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे यांची महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय युक्ती होणार असल्याचं बोललं जात आहे. यावर भाष्य करताना मनोज जरांगेंनी राज ठाकरेंना लक्ष केलं आहे.
….म्हणजे तुम्ही झालेत खुश
आता नगरपालिकेचा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यात ठाकरे बंधूनी एकत्र कार्यक्रम घेतला तर ते भयाभीत झालेत. पुन्हा मुख्यमंत्री जवळ येत तुमच्या घरी जेवलेत म्हणजे तुम्ही झालेत खुश मात्र त्यामुळे गेला तुमचा पक्ष खड्ड्यात, अशी जहरी टीका मनोज जरांगेंनी केली आहे.
हेही वाचा : मराठा आंदोलनाचा आज तिसरा दिवस; मध्यरात्री मनोज जरांगेंची तब्येत बिघडली….





