कसा आहे ‘माँ’ चित्रपट? काजोलचं दमदार कमबॅक प्रेक्षकांना कसं वाटलं? प्रतिक्रिया वाचा…

How is the movie Maa? गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला आणि अभिनेत्री काजोलची मुख्य भूमिका असलेला माँ हा हॅारर चित्रपट आज २७ जून रोजी थिएटर्समध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटातून मोठ्या ब्रेकनंतर काजोलने सिनेविश्वात कमबॅक केले आहे. ती पहिल्यांदाच हॅारर चित्रपटात अभिनय करताना दिसत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया एक्सवरून शेअर केल्या आहेत.
नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया संमिश्र स्वरुपाच्या असून, कोणाला हा चित्रपट आवडला आहे, तर काही जण चित्रपटाची तुलना शैतान चित्रपटासोबत करत आहेत. काही जण माँ एक अॅव्हरेज चित्रपट असल्याचे देखील म्हटले आहे. यामुळे काजोलच्या माँ चित्रपटाच्या प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहे. सिनेविश्लेषकांनी माँ हा चित्रपट बॅाक्स अॅाफिसवर चांगली कमाई करेन, असा अंदाज व्यक्त केला आहे.
#MaaReview :- Strictly Average
Rating : ⭐ ⭐ ✨ [ 2.5/5 ]@itsKajolD decent Performance & VFX is the only Saving grace for #Maa, Routine Story ,Tiring music 🎶 Ordinary casting ,poor direction wth force horror element .Evokes no GoosebumpWatch it on your own risk@ajaydevgn pic.twitter.com/u75W8JMk0m
— Manoz Kumar (@ManozTalks) June 27, 2025
माँ हा चित्रपट एक भयपट असून चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया यांनी केले आहे. ही एका आईची कथा आहे जी आपल्या मुलीला भुतांपासून वाचवण्याचा प्रयत्न करते असते. हा चित्रपट पाहिल्यानंतर नेटिझन्सनी एक्सवरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा चित्रपट तुम्हाला खरोखर घाबरवू शकतो आणि भावनिक पैलू उत्तमप्रकारे चित्रित केले आहेत, असे एका प्रेक्षकाने म्हटले आहे.
#MaaTheFilm #maa one word review .. UNBEARABLE left cinema hall in 30 min. Is this a joke
— GURU FILMY (@Filmyboy3) June 27, 2025
हा चित्रपट अजय देवगणच्या ‘शैतान’पेक्षा कमी दर्जाचा असल्याचे काहीजण सांगत आहे. याशिवाय काही लोक याला विनोद म्हणत आहेत. काही जण चित्रपटाला ४ स्टार देत आहेत, तर काही जण २ स्टार देत आहेत.
हेही वाचा : रक्ताने माखलेला चेहरा, तीक्ष्ण नजर अन्…; रश्मिकाचा भीतीदायक लूक समोर; चित्रपटाचे नाव काय? फोटो पाहा





