Ali Khamenei Death : अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे मोठे नुकसाने झाले आहे. काल २८ फेब्रुवारीला युद्धाचा भडका उडाला आणि आज थेट इराणचे सर्वेाच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. ते 86 वर्षांचे होते. यानंतर जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. आता खामेनी नेमके कसे मारले गेले? याबाबतची मोठी माहिती समोर आली आहे. मीडिया अहवालांनुसार, खामेनी हे सुरक्षा परिषदेचे सल्लागार अली शमखानी आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे प्रमुख मोहम्मद पाकपूर यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक सुरू असतानाच इस्त्रायलने त्या ठिकाणी स्ट्राइक केला. हा हल्ला इतका भीषण होता की यात खामेनी यांचा मृत्यू झाला, असे वृत्त देण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार, इस्रायलआणि अमेरिका अली शमखानी यांचा सातत्याने मागोवा घेत होते. शनिवारी ते खामेनी यांना भेटण्यासाठी गेले असताना, दोन्ही देशांनी संयुक्तरीत्या खामेनी यांच्यावर हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, खामेनी यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबातील आणखी चार सदस्यांचाही मृत्यू झाल्याची पुष्टी इराणी माध्यमांनी केली आहे. यामध्ये मुलगी, जावई आणि नात यांचा समावेश आहे. खामेनी यांच्या निधनानंतर 40 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मध्यपूर्वेत तणावाची परिस्थिती कायम आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने अनेक अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले होते. आज १ मार्च रोजी हलाई हल्ल्यात इराणच्या सर्वेाच्य नेत्याचा कुटुंबासह अंत झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आयातुल्ला अली खामेनी यांचा एका लष्करी मोहिमेदरम्यान मृत्यू झाला असल्याचा दावा केला होता. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये खामेनी यांना इतिहासातील सर्वात वाईट व्यक्तींमधील एक असे संबोधले आहे. मध्यपूर्वेत आणि जगात शांतता प्रस्थापित होईपर्यंत किंवा संपूर्ण आठवडा अखंडपणे बॉम्बहल्ले सुरू राहतील, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यामुळे विविध तर्क वितर्कांना उधाण आले आहे. हेही वाचा : Ali Khamenei Death : अयातुल्ला अली खामेनींच्या मृत्यूनंतर इराणचे सुप्रीम लीडर कोण? ‘या’ नावांची चर्चा