IPL 2025 Playoffs : मुंबई इंडियन्सला प्लेऑफनंतर टॉप-२ मध्ये पोहोचण्याची संधी! काय आहे समीकरण?

Mumbai Indians’ Path to IPL 2025 Playoffs Top-2 Finish : आयपीएल २०२५ चा हंगाम आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे, जिथे सर्व प्लेऑफचे संघ निश्चित झाले आहेत. गुजरात टायटन्स, आरसीबी, पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे संघ प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. संध्या, शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरातचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे, तर मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईला अजूनही पॉइंट्स टेबलमध्ये टॉप-२ मध्ये येण्याची संधी आहे. ती कशी? जाणून घेऊया.
मुंबई इंडियन्सचा एक सामना शिल्लक –
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण १३ सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी ८ जिंकले आहेत आणि पाच गमावले आहेत. त्याचा १६ गुणांसह नेट रन रेट अधिक १.२९२ आहे. ते पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. चालू हंगामात मुंबईचा अजूनही एक सामना शिल्लक आहे, जो त्यांना २६ मे रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध खेळायचा आहे. टॉप-२ मध्ये पोहोचण्यासाठी, मुंबईला पंजाब किंग्ज विरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल, जेणेकरून त्यांना १८ गुण मिळतील.
मुंबईला नशिबाच्या साथही आवश्यक –
𝙋𝙡𝙖𝙮𝙤𝙛𝙛𝙨 𝙎𝙚𝙘𝙪𝙧𝙚𝙙 🔢
Did your favourite team qualify for the Playoffs? 🤔#TATAIPL pic.twitter.com/LtiXumlWdq
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2025
याशिवाय, मुंबईला आरसीबी आणि पंजाब संघांनी त्यांचे उर्वरित सामने गमावावेत अशी प्रार्थना करावी लागेल. या दोन्ही संघांचे दोन सामने शिल्लक आहेत. आरसीबी आणि पंजाब किंग्जचे सध्या प्रत्येकी १७ गुण आहेत. अशा परिस्थितीत, जर हे दोन्ही संघ उर्वरित सामने गमावले तर त्यांच्याकडे तेवढेच गुण राहतील आणि मुंबई १८ गुणांसह त्यांच्या पुढे असेल. सध्या, आरसीबी आणि पंजाब किंग्ज संघ मुंबईला टॉप-२ मध्ये पोहोचण्याच्या मार्गात अडथळा आणत आहेत.
हेही वाचा – IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! वैभव-आयुषसह ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
पॉइंट्स टेबलमध्ये टॉप-२ मध्ये असण्याचा काय असतो फायदा?
आयपीएल पॉइंट्स टेबलमध्ये टॉप-२ मध्ये असणाऱ्या संघांना फायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोन संध असतात. या संघांना थेट पहिला क्वालिफायर सामना खेळण्याची संधी असते. या सामन्यातील विजेता संघ थेट फायनलमध्ये पोहोचतो, तर पराभूत संघला दुसरा क्वालिफायर खेळण्याची संधी असते, ज्यामध्ये तो संघ एलिमिनेटर सामन्यातील विजेत्या संघाशी भिडतो. एलिमिनेटर सामना हा पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या आणि स्थानी असलेल्या संघात खेळला जातो. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यातील विजेता थेट फायनलमध्ये पहिल्या क्वालिफायरमधील विजेत्या संघाशी सामना करतो.





