नेवासा, (प्रतिनिधी)- नेवासेकरांवर राच्या वेळेस तिसरा डोळा नेमका कोणाचा? ड्रोनच्या सहाय्याने हंडीनिमगाव आणि नेवासा शहरातील संभाजीनगर प्रभागात ड्रोनच्या घिरट्या अचानक सुरू झाल्यामुळे नेमके हे काय प्रकरण? याबाबत नेवासा शहर आणि परिसरातील नागरिक प्रचंड गोंधळून गेलेले आहे. काही युवकांनी या ड्रोन घिरट्या घालताना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हे दृष्य कैद केल्यामुळे या ड्रोनबाबत अनेकांकडून तर्कविर्तक सुरू झालेला आहे. सोमवारी नेवासा शहरातील संभाजीनगर आणि हंडीनिमगाव शिवारामध्ये रात्रीच्या वेळी अंधारात ड्रोन उडवून नक्की काय शोध घेतला जातो याचा शोध नेवासा पोलिसांना घेऊन नागरिकांमध्ये झालेल्या गूढ शंकेचे निरासन करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे रात्रीच्या वेळी अचानक सुरू झालेल्या ड्रोनच्या घिरट्यामुळे नागरिक भीतीच्या सावटाखाली आलेले असून हे ड्रोन नेमके कोण उडवत आहे ? कशासाठी उडवत आहे? याचा शोध घेण्याची मागणी नेवासा नगरपंचायतीचे नगरसेवक जितेंद्र कुऱ्हे यांनी केली आहे.