नवी दिल्ली – प्रॉप इक्विटी या संस्थेने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार सरलेल्या 2024 वर्षात देशातील नऊ मोठ्या शहरात झालेली घर विक्री मूल्यात12 टक्क्यांनी वाढून 6.73 लाख कोटी रुपयांची झाली आहे. या वर्षात पुण्यातील घर विक्री मात्र एक टक्क्याने कमी झाली. या वर्षात पुण्यात 76,000 कोटी रुपयांची घरे विकली गेली. गेल्या वर्षी पुण्यात 77 हजार कोटी रुपयांची घरे विकली गेली होती, असे या संस्थेचे म्हणणे आहे. मुंबईतील घर विक्री 13 टक्क्यांनी वाढून 1.38 लाख कोटी रुपयांची झाली आहे. जी की गेल्या वर्षी 1.22 लाख कोटी रुपयांची होती. ठाण्यात 2024 मध्ये 56 हजार कोटी रुपयांची घरे विकली गेली. 2023 मध्ये विकल्या गेलेल्या 53 हजार कोटी रुपयांच्या घरापेक्षा ही विक्री सहा टक्क्यांनी जास्त आहे. नवी मुंबई शहरात घर विक्री 32 टक्क्यांनी वाढून 25,000 कोटी रुपये झाली. 2023 मध्ये या घर विक्रीचे मूल्य 19 हजार कोटी रुपये इतके होते. हैदराबाद शहरातील घर विक्री 18 टक्क्यांनी कमी होऊन 1.05 लाख कोटी रुपयांची झाली आहे. जीकी 2023 मध्ये 1.28 लाख कोटी रुपये होती. बंगळूर शहरातील घर विक्री 13 टक्क्यांनी वाढून 85,000 कोटी रुपयांची झाली आहे. 2023 मध्ये विकल्या गेलेल्या 75 हजार कोटी रुपयांच्या घरांची विक्री झाली होती. चेन्नईमधील घरांची विक्री पाच टक्क्यांनी वाढून 20,000 कोटी रुपयांची झाली आहे. 2023 मध्ये चेन्नईत 19 हजार कोटी रुपयांच्या घराची विक्री झाली होती. कोलकाता शहरातील घराची विक्री 15 टक्क्यांनी वाढून 15,000 कोटी रुपयांची झाली आहे. जी की 2023 मध्ये 13,000 कोटी रुपये होती. दिल्लीत सर्वाधिक विक्री दिल्ली शहरातील घर विक्री सर्वाधिक म्हणजे 63 टक्क्यांनी वाढून 1.53 लाख कोटी रुपयांची झाली आहे. 2024 मध्ये या शहरात 94,143 कोटी रुपयांच्या घरांची विक्री झाली होती. टॉप इक्विटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर जसूजा यांनी सांगितले की, दिल्लीत सर्वसाधारणपणे प्रतिवर्ग फूट जागेची किंमत 12,469 रुपये इतकी आहे दिल्ली राजधानी क्षेत्रात पायाभूत सुविधा वेगाने वाढत आहेत. त्याचबरोबर लगतच्या भागात औद्योगिक घडामोडी वाढल्या आहेत. त्यामुळे घर विक्री वाढत आहे.