‘हाउसफुल ५’च्या ‘दिल ए नादान’ गाण्याचा टीझर प्रदर्शित

HouseFull 5 Songs: हाउसफुल ५ या बहुप्रतीक्षित चित्रपटातील पहिल्या लाल परी गाण्यानंतर आता दुसऱ्या दिल ए नादान या गाण्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जॅकलीन फर्नांडिस, नरगिस फाखरी आणि सोनम बाजवा यांच्या जबरदस्त डान्स मूव्ह्सने चाहत्यांचे मन जिंकले आहे.
अक्षय कुमारने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर टीझर शेअर करत गाण्याबाबत माहिती दिली. पूर्ण गाणे उद्या (दि. १५ मे) प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर केले. हा चित्रपट ६ जून २०२५ रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल, असेही त्यांनी नमूद केले.
टीझरमधील नरगिस फाखरी, सोनम बाजवा आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्या आकर्षक डान्स मूव्ह्सने चाहत्यांना भुरळ घातली आहे. सोशल मीडियावर चाहते हार्ट आणि फायर इमोजींसह उत्साह व्यक्त करत आहेत.
View this post on Instagram
हाउसफुल ५ विनोदी थ्रिलर चित्रपट असून, नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली निर्मित, ही हाउसफुल फ्रँचायझीतील पाचवी आवृत्ती आहे. चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, फरदीन खान, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, डिनो मोरिया, जॅकलीन फर्नांडिस, नरगिस फाखरी, चित्रांगदा सिंह, सोनम बाजवा, सौंदर्या शर्मा, चंकी पांडे आणि जॉनी लिव्हर यांच्या दमदार स्टारकास्टचा समावेश आहे.




