पंजाबमध्ये भीषण अपघात ; बस उलटल्याने १० जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Hoshiarpur Bus Accident । पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यात आज सकाळी एक भीषण अपघातझाल्याची माहिती समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेली बस रस्त्याच्या मधोमध पलटी गेल्याचे सांगण्यात येत आहे. या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, तर १२ हून अधिक प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती उघड झाली आहे.
बस नियंत्रण बाहेर गेल्याने अपघात Hoshiarpur Bus Accident ।
होशियारपूरमधील दसुहा-हाजीपूर रोडजवळील सागरा अड्डा याठिकाणी हा अपघात झाला. याठिकाणी एक बस नियंत्रणाबाहेर गेली आणि उलटली गेली. प्रवाशांनी आरडाओरडा सुरू करताच, जवळचे लोक जमले आणि त्यांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. दरम्यान, पोलिसांना माहिती देण्यात आली आणि रुग्णवाहिका बोलावण्यात आली. जवळच्या लोकांच्या मदतीने पोलिस पथकाने जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
खाजगी कंपनीची बस Hoshiarpur Bus Accident ।
अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. ही एक मिनी बस होती, जी खाजगी कंपनीची असल्याचे सांगितले जात आहे. सध्या अपघाताचे कारण समोर आलेले नाही, परंतु पोलिस तपासात गुंतले आहेत.
हा अपघात चालकाच्या चुकीमुळे झाला, की बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला किंवा रस्त्यावर इतर काही कारणांमुळे चालकाचे नियंत्रण सुटले, हे अद्याप निश्चित झालेले नाही. सध्या पोलिस पथक जखमींना प्राधान्याने रुग्णालयात घेऊन जात आहे आणि मृतांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.





