Accident News : मिसिंग लिंकवर भीषण अपघात! पुण्यातील उद्योजक तरुणाचा जागीच मृत्यू; नेमकी कशी घडली घटना?
Accident News : कारमधील अन्य तिघे जण सुदैवाने बचावले. प्राथमिक माहितीनुसार, फॉर्च्युनरमधील सर्व पाच ही जण पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथील भूमकर चौक परिसरातील रहिवासी आहेत.

हिंजवडी : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’च्या बोगद्यात आज पहाटे दीड वाजता झालेल्या भीषण अपघातात वाकडचे युवा उद्योजक तुषार भूमकर यांचा मृत्यू झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी त्यांची फॉर्च्युनर कार महामार्गावरील मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडकली.
या भीषण धडकेत तुषार भूमकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. कारमधील अन्य तिघे जण सुदैवाने बचावले. प्राथमिक माहितीनुसार, फॉर्च्युनरमधील सर्व पाच ही जण पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथील भूमकर चौक परिसरातील रहिवासी आहेत. (Accident News)
तुषार भूमकर यांच्या अपघाती मृत्युमुळे वाकड परिसरात शोककळा पसरली असून, सामाजिक व राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नीने काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर प्रभाग 25 मधून महापालिका निवडणूक लढवली होती. (Accident News)
नेमका अपघात कसा घडला? (Accident News)
मिळालेल्या माहितीनुसार, मिसिंग लिंकच्या दोन लेनवर काही वाहने उभी असल्याने वेगात असलेल्या भूमकर यांच्या गाडीचे नियंत्रण सुटल्याने वेगात असलेली गाडी मालवाहू ट्रक ला धडकली त्यामुळे हा भीषण अपघात झाल्याचे समजते. मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंकच्या सुमारे ९ किलोमीटर लांबीच्या बोगद्यात रात्री दीड वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या फॉर्च्युनर (MH 14 MG 0007) या भरधाव कारने मुंबईच्या दिशेने भाजीपाला वाहतूक करणाऱ्या मालवाहू टेम्पोला (MH 01 CR 7075) जोरदार धडक दिली.
अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे दोन तास बंद ठेवत सर्व वाहने जुन्या मार्गाने मुंबईकडे वळविण्यात आली होती. महामार्ग पोलीस, आयआरबी पथक देवदूत आणि मदत यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दोन्ही अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून हटवल्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास महामार्ग पोलीस करत आहेत.





