भीषण अपघात : नवरदेवाला घेऊन जाणारी कार नदीत कोसळली; नवरदेवासह 9 ठार

कोटा – राजस्थान कोटामध्ये रविवारी नवरदेवासह नऊ जणांना घेऊन जाणारी कार चंबल नदीत कोसळली. या भीषण अपघतात नवरदेवासह सर्वांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना कोटाच्या नयापुराजवळ घडली. या घटनेची माहिती मिळल्यानंतर पोलीस अधिकारी आणि नगरपालिका गोताखोरची टीमने दोन तास बचावकार्य केले. नदीत बुडालेल्या सर्व लोकांचे मृतदेह बाहेर टाकण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटा जिल्ह्यातील चौथ येथील बरवाडाचा रहिवासी नवरदेव अविनाश वाल्मिकी यांचे आज लग्न होते. ते वऱ्हाड घेऊन उज्जैनला जात होते. वरातीच्या बसमध्ये प्रवासी आणि कारमध्ये नवरदेवासह 9 जण शनिवारी रात्री दोन वाजता बरवाडाहून रवाना झाले होते.
यानंतर मधेच रस्त्यात सर्व प्रवासी एका दुकानावर चहा पिण्यासाठी थांबले होते. त्यानंतर पुन्हा रवाना झाले तर बस पुढे निघून गेली. जेव्हा बस खूप पुढे निघून तेव्हा नवरदेवाच्या वडिलांनी कारमध्ये प्रवास करत असलेल्या लोकांना फोन केला, पण कोणाशीही संर्पक झाला नाही.
यानंतर अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि बचाव पथकाच्या मदतीने गाडी नदीतून बाहेर काढण्यात आली. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतदेहांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.





