मेष : प्रगतीच्या रथावर स्वार झाल्याने यशाची धुंदी राहील. मात्र ती धुंदी डोक्यात जाणार नाही याची दक्षता घ्या.
वृषभ : व्यवसायात महत्वाचे निर्णय घ्याल. भविष्यात फायदा देणाऱ्या कामासाठी धोका पत्करण्याची तयारी असेल.
मिथुन : चुकीच्या संगतीने कोणतेही निर्णय घेऊ नका. नोकरीत सहकारी व वरिष्ठ मतलबापुरते तुमचा वापर करतील.
कर्क : कामात जादा सवलती मिळतील. घरात शुल्लक कारणावरून गैरसमज होण्याची शक्यता आहे.
सिंह : डोके शांत ठेवा. महिलांनी आवडता छंद जोपासावा. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
कन्या : येणाऱ्या अडचणींवर मात करुन पुढे जाण्याचा सकारात्मक विचार कराल. घरात तरुणांचे विवाह ठरतील.
तूळ : व्यवसायात उलाढाल वाढवण्यासाठी पैशाची तजवीज करावी लागेल. जागा विकून भांडवल उभारावे लागेल.
वृश्चिक : फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घेऊन पूर्ण कराल. स्वयंसिद्ध राहून काम केलेत तर लाभ होईल.
धनु : नोकरीत बढाया न मारता कृतीवर भर दया. कोणतेही आश्वासन देण्यापूर्वी कुवत ओळखून मगच दया.
मकर : विचारांची योग्य सांगड घालून कामे मार्गी लावा. जुने प्रश्न पुन्हा डोके वर काढतील विचारांती निर्णय घ्या.
कुंभ : दगदग धावपळ कमी करावी. पैशाची ऊब मिळाल्याने हायसे वाटेल. व्यवसायात आत्मविश्वास बळावेल.
मीन : अतिश्रम व अतिविचार मात्र टाळा. उद्दीष्ट साध्य करण्यासाठी कामाचे योग्य नियोजन करा.