मेष : योग्य संधीची वाट बघा. घरात मुलांच्या प्रगतीबाबत समाधानी रहाल. अपेक्षित कामे मार्गी लागतील.
वृषभ : प्रियजनांच्या भेटीने आनंदी व्हाल. या सप्ताहात सभोवतालच्या व्यक्तींची पारख होईल.
मिथुन : कठीण प्रसंगी कोणीही मदतीला नसते याची जाणीव होईल. महिलांनी अतिविचार करू नये.
कर्क : व्यवसायात कायद्याच्या चौकटीत राहून व्यवहार करा. नियमांचे उल्लंघन होणार नाही दक्षता घ्या.
सिंह : हातातील पैशाचा विनियोग योग्य कारणासाठीच करावा. घरात गैरसमजुतीने होणारे वार टाळा.
कन्या : नोकरीत कामात चोख राहून सहकाऱ्यांनाही कामात मदत कराल. मात्र इतरांकडून मदतीची अपेक्षा नको.
तूळ : प्रतिष्ठित व्यक्तींकडून चार हात लांब रहाणे हितावह. कामाबाबत वाच्यता न करणे फायद्याचे राहील.
वृश्चिक : सलोख्याचे धोरण ठेवून प्रश्न मार्गी लावा. तडजोडीने कामे यशस्वी कराल. नवीन कामे मिळतील.
धनु : बाजारातील चढउतारांचा व स्पर्धकांचा अंदाज घेऊन तुम्ही तुमची धोरणे आखा. एकाग्रता अभ्यास करावा.
मकर : हाती घेतलेल्या कामात लक्ष केंद्रित करा. उधारीपेक्षा रोखीच्या व्यवहारांवर भर द्या.
कुंभ : नोकरीत वरिष्ठ नवीन कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील. जादा अधिकार व सवलतीही देतील.
मीन : नवीन हितसंबंध जोडले जातील. जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल.