मेष : कामात झालेली हयगय मात्र तुम्हाला सहन होणार नाही तरी सजग रहा. चिकाटी सोडू नका.
वृषभ : घरात कार्यपद्धतीत बदलामुळे व्यक्तींची विचारधारा बदलेल. आप्तेष्ट नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील.
मिथुन : मुलांकडून सुवार्ता कळेल. महिलांनी प्रकृतीची हेळसांड करू नये. तरुणांनी अतिसाहस टाळावे.
कर्क : नोकरीत चांगल्या संधीसाठी तुमची निवड होईल. चांगल्या गोष्टींची नांदी होईल तरी वाट बघा.
सिंह : व्यवसायात मिळालेल्या संधीचा जास्तीतजास्त फायदा घ्या. मोठया व्यक्तींच्या सहवासाने आनंद मिळेल.
कन्या : निराशा झटकून ठरवलेल्या पद्धतीने कामे पूर्ण कराल कुणावरही शक्यतो अवलंबून राहू नका.
तूळ : नोकरीत शिस्तबद्ध राहून हातातील कामे पूर्ण कराल. मानसिक समाधान मिळेल.
वृश्चिक : सहकारी व वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढीत नाहीत ना याकडे लक्ष द्या. विवाह जमतील.
धनु : सहकाऱ्यांच्या गोड शब्दाला बळी पडू नका. घरात नवीन वस्तू खरेदीचा मोह होईल.
मकर : स्वयंसिद्ध राहून कामे करण्याचा विचार राहील. व्यवसायात मर्यादा ओळखून कामे पूर्ण कराल.
कुंभ : हाती घेतलेली कामे बिनचूक पूर्ण करून मगच नवीन कामांकडे वळा. पैशाची उभारणी करावी लागेल.
मीन : नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे केलीत तर लाभ होईल. निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल.