Pune District : शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
Pune District : ऊस लागवडीपूर्वीची पूर्व मशागत, योग्य लागवड पद्धत, सेंद्रिय खतांचा वापर, बेणे बदल, सुधारित जातींची निवड, बेसल डोस, बाळबांधणीचे महत्त्व, माती परीक्षण, खत व्यवस्थापन, सुपरकेन नर्सरी, ठिबक सिंचन व पाणी व्यवस्थापन याबाबत त्यांनी माहिती दिली.

तळेगाव ढमढेरे : श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे विठ्ठलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना, पाटेठाण यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंतांचा सत्कार, रोपवाटप कार्यक्रम, शेतकऱ्यांसाठी ऊस पिक परिसंवादाचे आयोजन केले. शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सारपंच कांतीलाल गवारे होते. यावेळी माजी मुख्याध्यापक जगन्नाथ गवारी, श्री पांडुरंग विद्यामंदिरचे माजी मुख्याध्यापक रामराव दौंडकर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे प्रवक्ते दादासाहेब गवारी, निमगाव म्हाळुंगी येथील विद्या विकास मंदिर विद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. नागनाथ शिंगाडे, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी दीपक रोडे यांचा शाल, श्रीफळ व रोप देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रवीणकुमार जगताप यांना प्रा. हरी नरके पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. दरम्यान, शेतकऱ्यांना ऊस विकास अधिकारी दीपक रोडे यांनी ऊस पिक परिसंवादाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. ऊस लागवडीपूर्वीची पूर्व मशागत, योग्य लागवड पद्धत, सेंद्रिय खतांचा वापर, बेणे बदल, सुधारित जातींची निवड, बेसल डोस, बाळबांधणीचे महत्त्व, माती परीक्षण, खत व्यवस्थापन, सुपरकेन नर्सरी, ठिबक सिंचन व पाणी व्यवस्थापन याबाबत त्यांनी माहिती दिली.
यावेळी खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक काळुराम गवारे, घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक हिरामण गवारे, विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष लव्हाजी लोखंडे, शिरूर बाजार समितीचे माजी संचालक राहुल गवारे, माजी सरपंच लोभाजी आल्हाट, माजी उपसरपंच सोपान गवारे, दिलीप गवारे, राजेंद्र शिंदे, हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष बबन गवारे, उपाध्यक्ष बापू पवार, उद्योजक युवराज गवारे, सोसायटीचे अध्यक्ष वैभव गवारे, उपाध्यक्ष ॲड. संतोष गवारे, माजी उपाध्यक्ष रायचंद शिंदे, हरिभाऊ गवारे, माजी संचालक शांताराम गवारे, माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर राऊत, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब गवारे, माजी अध्यक्ष किसन गवारे, माजी मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. ॲड. संतोष गवारे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मधुकर दोरगे यांनी केले. वैभव गवारी यांनी आभार मानले.
पीक फेरपालट गरजेचे
हुमणी नियंत्रण, पीक फेरपालट, आंतरपिके, ऊस रोपांची लागवड तसेच शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या विविध बाबींवरही त्यांनी प्रकाश टाकला. शेतकऱ्यांनी एक डोळा ऊस लागवड पद्धतीचा अवलंब करून योग्य व्यवस्थापन केल्यास ऊस उत्पादन वाढविण्यास मदत होईल, असे दीपक रोडे यांनी सांगितले.





