Nagar: शुभम चव्हाण यांचा त्रिवेणीश्वर देवस्थानच्यावतीने गौरव

नेवासा – नेवासा तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील ज्येष्ठ विधीतज्ज्ञ अँड.बाळासाहेब चव्हाण यांचे चिरंजीव शुभम चव्हाण यांची महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये प्रथम श्रेणीत निवड झाल्याबद्दल हंडीनिमगाव येथील त्रिवेणीश्वर देवस्थानच्या वतीने गौरव करण्यात आला.
त्रिवेणीश्वर देवस्थानच्या सभामंडपामध्ये झालेल्या कार्यक्रमप्रसंगी महंत स्वामी रमेशानंदगिरी महाराज, हभप लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, गरुड पुराण कथाकार रामनाथ महाराज ठोंबरे, विधीतज्ज्ञ अँड.बाळासाहेब चव्हाण, प्रा.नवनाथ आगळे, माजी सरपंच नवनाथ चव्हाण, जालिंदर ससे, ज्ञानदेव तुपे, दिलीप चव्हाण, प्रा.कार्तिकी नागरे, प्रा.गणेश गारुळे, सेवेकरी गोरखभाऊ गुंजाळ, शरद क्षीरसागर, महिला उद्योजिका दीपाली औटी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत प्रथम श्रेणीत निवड झाल्याबद्दल त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत स्वामी रमेशानंदगिरी महाराज यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, बुके देऊन शुभम चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. प्रा.नवनाथ आगळे यांनी बुके व पुस्तक भेट देऊन राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने गौरव केला.





