सापडलेली सोन्याची अंगठी मूळ मालकाला शोधून दिली परत; ग्रंथपालाच्या प्रामाणिकपणाचं जिल्ह्यात कौतुक

शिक्रापूर – येथील ग्रामपंचायत कार्यालयात काही कामानिमित्त आलेल्या ग्रामस्थाची सोन्याची अंगठी हरवल्यानंतर ती ग्रामपंचायतचे ग्रंथपाल संतोष काळे यांना सापडली. अंगठी पोलिसांच्या माध्यमातून मूळ मालकाला परत देण्यात आली असताना संतोष काळे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
येथील संतोष राऊत हे 9 डिसेंबर रोजी काही कामानिमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयात आले असताना त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी तेथे पडली, काही वेळाने सती संतोष काळे यांना सापडली. ती त्यांनी शिक्रापूर पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या ताब्यात देत घडलेला प्रकार सांगितला.
संतोष काळे यांना सापडलेली अंगठी पोलीस ठाण्यात जमा केल्याबाबतचे फोटो सोशल मिडीयावर प्रसारित झाले. आपल्या अंगठीची ओळख पटवल्यानंतर अंगठी राऊत यांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे व ग्रामपंचायत सदस्य मयूर करंजे यांनी संतोष काळे यांच्या प्रामाणिकपणा बद्दल कौतुक केले.





