घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त

लोणी काळभोर : येथील पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने घरफोडी, जबरी चोरी करणा-या तिघांना जेरबंद केले असून त्यांच्या कडून साडे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त कल्याणराव विधाते यांनी दिली. या तिघांवर घरफोडी, जबरी चोरीचे एकुण ७८ गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणी जयसिंग काळुसिंग जुनी ( वय. २८ ), सोमनाथ नामदेव घारुळे ( वय. २४, दोघेही राहणार बिराजदार नगर, वैदवाडी, हडपसर, पुणे ) व बल्लुसिंग प्रभुसिंग टाक ( वय. २६, रा. उरुळी देवाची, ता. हवेली ) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी कल्याणराव विधाते यांनी वरील माहिती दिली. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सुभाष काळे, सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर व पोलीस पथक उपस्थित होते.
३ मे च्या मध्यरात्री लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंतरवाडी, हांडेवाडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरफोड्या केल्या होत्या. तसेच ६ मे रोजी संदीप चिंचोरे हे रस्त्याने जाताना उरुळी देवाची येथे लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबले होते. त्या वेळी चारचाकीमधून आलेल्या तिघांनी चाकूचा धाक दाखवून त्यांचे दोन मोबाईल चोरुन नेले होते.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व सह आयुक्त डाॅ. रविंद्र शिसवे यांनी गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे करणारे, व सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर, हवालदार नितीन गायकवाड, गणेश सातपुते, अमित साळुंखे, बाजीराव वीर, निखील पवार, श्रीनाथ जाधव, सुनील नागलोत, शैलेश कुदळे, रोहिदास पारखे, राजेश दराडे व दिगंबर साळुंखे हे पोलीस पथक उरुळी देवाची, हांडेवाडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी दोन संशयास्पद इसम दुचाकीवर फिरत असल्याची माहिती मिळाली. या पथकाने दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते न थांबता पळून गेले. पोलीसांनी पाठलाग करून जयसिंग जुनी व सोमनाथ घारुळे या दोघांना जेरबंद केले.
त्यांच्या कडे चौकशी केली असता बल्लुसिंग टाक याचे नाव कळाले. पोलीस पथकाने बल्लुसिंग टाक याचा पाच किलोमीटर पाठलाग केला. त्याने डोंगरावर गाडी नेली. तेथील दगडावर गाडी घसरून तो पडला. तरीही तो तेथून एक किलोमीटर अंतर पळाला. शेवटी आता पोलीस आपल्याला पकडणार हे समजताच त्याने खिशातून ब्लेड काढून अंगावर अंदाजे शंभर ठिकाणी वार केले. पोलीसांनी त्याला पकडून पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर तो बरा झाल्यावर त्याला अटक केली आहे.
या तिघांकडून ७३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक टिव्ही, एक डिव्हीआर, दोन मोबाईल, एक सॅन्ट्रो कार, एक दुचाकी असा एकूण साडे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हे तिघेही सराईत गुन्हेगार असून जयसिंग जुनी याच्या वर ११, सोमनाथ घारुळे वर ४ तर बल्लुसिंग टाक वर ६३ गुन्हे दाखल आहेत. या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या तिघांकडून लोणी काळभोर व हडपसर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी ३ असे एकूण ६ गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सुभाष काळे, सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर, हवालदार नितीन गायकवाड, गणेश सातपुते, अमित साळुंखे, श्रीनाथ जाधव, सुनील नागलोत, निखील पवार, शैलेश कुदळे, बाजीराव वीर, रोहिदास पारखे, राजेश दराडे, दिगंबर साळुंखे या पोलीस पथकाने केली आहे.
पोलीस स्टेशन हददीत दि.०३/०५/२०२१ रोजीचे मध्यरात्री मंतरवाडी तसेच हांडेवाडी परीसरात अज्ञात चोरटयांनी बंद घरांचे कुलुप, कडी कोयंडे तोडुन घरात प्रवेश करून घरफोडी चोरी केली होती. या प्रकरणी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या घटनेत म्हणजेच तसेच दि.०६/०४/२०२१ रोजी इसम संदीप सुर्यकांत चिंचुरे हे त्यांचे साडु सोबत उरूळीदेवाची गावातुन जात असताना सॅन्ट्रो कारमधुन आलेल्या तीन अनोळखी इसमांनी चाकुचा धाक दाखवुन त्यांचेकडील दोन मोबाईल जबरी चोरी करून चोरून नेले होते. त्याबाबतही गुन्हा दाखल आहे.
वरीलप्रमाणे दाखल गुन्हयांचा तपास लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथील तपास पथक करीत होते. तपास पथक चोरट्यांचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलिस नाईक अमित साळुके, पोलीस कॉन्स्टेबल बाजीराव वीर, निखील पवार यांनी उरूळीदेवाची हांडेवाडी परीसरात गस्त घातली. त्यावेळी त्यांना माहीती मिळाली की,दोन इसम संशयस्पद रित्या
हांडेवाडी परीसरात मोटार सायकलवरून फिरत आहेत.
मिळालेल्यामाहितीनुसार माग करता संशयीत इसम मोटारसायकलवरून हांडेवाडी ते उरूळीदेवाची असे जात असताना दिसले त्यांना तपास पथकाने थांबवण्याचा इशारादिला असता सदरचे संशयीतानी त्यांची मोटार सायकल न थांबवता पोलीसांना चकवा देत भरधाव वेगात पुढे निघुन गेले.
तपास पथकाने त्यांचा मोठया शिताफीने पाठलाग करून त्यांना पकडले
जयसिंग जुनी(वय २८ वर्षे ,रा सर्वे नं.८६,बिराजदार नगर,वैदवाडी,हडपसर पुणे २)
सोमनाथ नामदेव घारूळे (वय २४ वर्षे रा.सदर) अशी असल्याचे सांगितले त्यांना ताबेत घेवुन तपास करता त्यांनी त्यांचा साथीदार बल्लुसिंग प्रभुसिंग टाक (वय २४ वर्षे,रा.सर्वे नं.११० रामटेकडी पुणे) याचेसह वरील गुन्हे केल्याचे सांगितले.
बल्लुसिंग प्रभुसिंग टाक यांसही शिताफीने पाठलाग करून ताबेत घेवुन वरील तिन्ही आरोपीतांकडे दाखल गुन्हयांचे अनुषंगाने अटक करून तपास करता आरोपीतांकडुन वरील गुन्हयात गेला मालापैकी ७३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने एक एलईडी टिव्ही.एक डि.व्ही.आर ,दोन मोबाईल,एक सॅन्ट्रो कार,एक मोटार सायकल, असा एकुण ६.५०,०००/- कि.रू.चा
माल हस्तगत करून जप्त करण्यात आला




