Holystico Astrana : होलिस्टिको अॅस्ट्रानाला ‘लक्झरी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ऑफ द इयर’ पुरस्कार
Holystico Astrana : होलिस्टिको ग्रुपच्या ‘होलिस्टिको अॅस्ट्राना’ प्रकल्पाला रिअल्टी+ कॉन्क्लेव्ह अँड एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६ मध्ये ‘लक्झरी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाला.

Holystico Astrana : रिअल इस्टेट क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी, नावीन्यपूर्ण संकल्पना आणि ग्राहककेंद्रित दृष्टिकोनाची दखल घेत होलिस्टिको ग्रुपच्या ‘होलिस्टिको अॅस्ट्राना’ या निवासी प्रकल्पाला ‘लक्झरी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुंबईतील ताज हॉटेल येथे झालेल्या १८ व्या ‘रिअल्टी+ कॉन्क्लेव्ह अँड एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६ – वेस्ट’ सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. होलिस्टिको ग्रुपच्या संचालिका समृद्धी खोतकर यांनी समूहाच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.
आलिशान वास्तुरचना, आधुनिक सुविधा, दर्जेदार बांधकाम आणि ग्राहकांना उत्तम जीवनशैलीचा अनुभव देण्याच्या संकल्पनेमुळे ‘होलिस्टिको अॅस्ट्राना’ची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
होलिस्टिको ग्रुपचे कार्याध्यक्ष दिलीप (आबासाहेब) तुपे, कार्यकारी संचालक इंद्रजीत तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण बोडके यांच्या नेतृत्वाखाली समूहाने रिअल इस्टेट क्षेत्रात गुणवत्ता, नावीन्य आणि ग्राहकांचा विश्वास यांना प्राधान्य दिले आहे.
‘होलिस्टिको अॅस्ट्राना’मध्ये आधुनिक वास्तुरचना आणि आलिशान जीवनशैलीचा संगम साधण्यात आला आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे. हा पुरस्कार समूहाच्या गुणवत्तेप्रती असलेल्या बांधिलकीचे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतीक असल्याचे होलिस्टिको ग्रुपने म्हटले आहे.





