होळीनिमित्त पाकिस्तानात दोन दिवस सुट्टी
Updated On:

कराची : होळीनिमित्त पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी हिंदू समुदायाला शुभेच्छा दिल्या आहेत.
होळी हा सण सोमवार आणि मंगळवारी पाकिस्तानमध्ये साजरा केला जात आहे. याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विट करून हिंदू जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
बलुचिस्थान प्रांतात होळी सणानिमित्त सरकारने दोन दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. हिंदू हा पाकिस्तानमधील सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय आहे. पाकिस्तान सरकारच्या अंदाजानुसार देशात 7.5 दशलक्ष हिंदू राहतात.





