दिल्लीतील विषारी हवेमुळे पाचवीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर

दिल्ली : दिल्लीतील प्रदूषणाने गुरुवारी अत्यंत धोकादायक पातळी गाठली. येथील 39 प्रदूषण निरीक्षण केंद्रांपैकी 32 ने वायु गुणवत्ता निर्देशांक (एक्युआय) गंभीर असल्याचे घोषित केले आहे. या हवेत श्वास घेणेही कठीण झाले आहे. येथे सर्व प्राथमिक (5वी पर्यंत) शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हे सर्व मुले आता ऑनलाइन वर्गात शिकतील.
एअर कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटने (सीएक्युएम) एनसीआर म्हणजेच हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून येणाऱ्या बसेसला दिल्लीत येण्यास बंदी घातली आहे. सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांसह बीएस-4 डिझेल बसना यातून सूट देण्यात आली आहे. दरम्यान, अमेरिकन शास्त्रज्ञ हिरेन जेठवा यांनी 14 नोव्हेंबर रोजी दिल्लीची सॅटेलाइट इमेज शेअर केली आहेत. यामध्ये दिल्लीत दाट धुके दिसून येत आहे. हिरेन हे अमेरिकेतील मॉर्गन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये एरोसोल रिमोट सेन्सिंग शास्त्रज्ञ आहे. नासाने हिरेन यांचे फोटोही शेअर केले आहेत.
निर्बंध कश्यावर?
– तोडफोडीवर बंदी, डिझेल वाहनांवर बंदी
– बांधकाम, खाणकाम आणि पाडकामावर बंदी
– दिल्ली, गुरुग्राम, फरिदाबाद, गाझियाबाद आणि गौतम बुद्ध नगरमध्ये बीएस-३ पेट्रोल व बीएस-४ वाहनांवर बंदी
– बीएस-३ डिझेलच्या आपत्कालीन वाहनांव्यतिरिक्त सर्व वाहनांवर दिल्लीत बंदी
यूपी, पंजाब, हिमाचलमध्ये दाट धुके
पंजाब-चंदीगडमध्ये धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थानमध्ये दोन दिवस दाट धुक्याचा इशारा आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये 15 नोव्हेंबरपर्यंत आणि हिमाचलमध्ये 18 नोव्हेंबरपर्यंत रात्री आणि सकाळच्या वेळी दाट ते दाट धुके राहील. हरियाणा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंडमध्ये 16 नोव्हेंबरपर्यंत धुके राहण्याची शक्यता आहे.





