Holi 2025 : रंग बरसे ते बलम पिचकारी…! ‘या’ सुपरहिट गाण्यांशिवाय होळी सेलिब्रेशन अशक्यच

Holi 2025 | Holi Song | Bollywood Song : होळी दहनानंतर दुसऱ्या दिवसापासून धुळवडीला सुरुवात होते. हा सण मौजमजेचा आणि बागडण्याचा आहे. भारतात होळी साजरी केली जाते रंगांच्या माध्यमातून. त्यामुळेच महाराष्ट्रासह देशभरात पुढील चार दिवस रंगाची उधळण दिसून येते. एकमेकांच्या चेहऱ्यावर रंग लावून होळीच्या शुभेच्छा देण्याची पद्धत आपल्याकडे आहे.
दरम्यान, सर्व सामान्याबरोबरचं बॉलिवूडपासून ते टीव्हीपर्यंतचे स्टार्सही थाटामाटात होळी साजरी करतात. आपल्याकडे होळीची अनेक गाणीही प्रसिद्ध आहेत. बॉलिवूड चित्रपटांमध्ये होळी खेळताना दाखविण्यात आले आहे. कोण-कोणती गाणी होळीसाठी लोकप्रिय आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत… जेणे करून तुमचा होळी खेळण्याचा आनंद आणखी शिगेला पोहचेल…
होली के दिन दिल खिल जाते है…
रंग बरसे भीगे चुनर वाली, रंग बरसे…
अंग से अंग लगाना सजन हमें ऐसे रंग लगाना…
जय जय शिव शंकर…!
सोनी अखियोंवाली…!





