Crime News : धक्कादायक..! १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; ५ आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Crime News : शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून एका १९ वर्षीय तरुणीला फसवून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.

Crime News : वर्ध्यात रेल्वे स्थानक परिसरातून १९ वर्षीय तरुणीला निर्जनस्थळी नेऊन सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एका गावातील ही तरुणी चंद्रपूरहून रेल्वेने वर्ध्यात आली होती. (Crime News)
बुधवारी मध्यरात्री सेवाग्राम रेल्वे स्थानकावर उतरून ती ऑटोने वर्धा रेल्वे स्थानक परिसरात पोहोचली. त्यानंतर एका संशयिताने तिला ऑटोमध्ये बसवून सहकाऱ्यांच्या मदतीने निर्जनस्थळी नेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Crime News)
गुरुवारी पहाटे माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी पीडितेचा शोध सुरू केला. दुपारी पीडिता शहरात आढळून आल्यानंतर संशयितांची ओळख पटवण्यासाठी दहा जणांना चौकशीसाठी आणण्यात आले. (Crime News)
त्यापैकी पाच जणांची पीडितेने ओळख पटवली असून, त्यामध्ये एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश असल्याची माहिती आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. (Crime News)





