पिंपरी | राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्ताने हॉकीपटू मेजर ध्यानचंद अभिवादन

पिंपरी, ( प्रतिनिधी) – महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन व सुवर्ण लोक स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्यावतीने, गुरुवार (दि.२९) रोजी दापोडी येथे भारताचे सुप्रसिद्ध हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस, मिक्स बॉक्सिंग महासंघ सचिव सचिन शिंगोटे व राष्ट्रीय मुष्टियुद्धा लोकेंद्र पेनोली, ज्येष्ठ क्रीडा संघटक सुरेश साळवी, कोमल काळभोर, श्रद्धा प्रसाद यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
क्रीडा क्षेत्रातील सर्व खेळाडूंना प्रेरणा मिळावी तसेच प्रत्येक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी, या महान हॉकीपटूचा जन्मदिवस आपल्या देशात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.
आपल्या देशाला क्रीडा क्षेत्राचा मोठा वारसा लाभला आहे. प्रत्येक जण कोणता ना कोणता खेळाचां प्रकार पसंद करतो तर काही लोक खेळात करिअर करत आहेत.
आज आपल्या मुलांना खेळाकडे वळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे कारण की, आज खेळाकडे वळणे खूप गरजेच्या आहेत आपलं शरीरामध्ये खेळाची आवड निर्माण करुन आपले शरीर हे निरोगी ठेवावे. असे प्रतिपादन लोकेंद्र पेनोली यांनी व्यक्त केले.
यावेळी सानवी लाकरे, आयरनी सावरकर, मनुष्री पाटील, साक्षी पाटील, ध्रुवा आवटी, कौशिकी जाध, शमिका सोमवंशी, समीरा पठाण, तन्वी गव्हाण, स्नेहल कांबळे, वैष्णवी शिंगोटे, देवांश कुमार, लक्षा करुल, तेजस रत्नापुरकर,
युवराज गोरे, सारंग भोसले, स्वरुप साठे, रेहान शेख, सारा शेख, आदित्य झरे, कौशिक पाटील, अभिजीत गवळी, पार्थ तांबरे हे खेळाडू उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र भंडारी यांनी केले तर आभार प्रदर्शन वैभव श्रीवास्तव यांनी मानले.


