Hockey India : भारताच्या माजी कर्णधाराचा हॉकीला अलविदा, 16 वर्षांच्या ऐतिहासिक कारकिर्दीला पूर्णविराम…

Rani Rampal Announces Retirement :- भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार असलेल्या राणी रामपाल हिने गुरुवारी निवृत्ती जाहीर केली. राणीच्या घोषणेने तब्बल 16 वर्षांच्या चमदार कारकिर्दीचा समारोप झाला. राणी रामपालने 2008 मध्ये ऑलिम्पिक पात्रता फेरीतून आंतरराष्ट्रीय संघातून पदार्पण केले होते. भारताच्या स्टार स्ट्रायकरने 250 पेक्षा अधिक लढतीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
An era of excellence comes to an end! 🇮🇳🏑
Today, we bid farewell to the one and only Rani Rampal, an icon who has defined Indian hockey for over a decade. From leading India to countless victories to being an inspiration for aspiring athletes across the country, Rani’s legacy… pic.twitter.com/TRer76L8Li
— Hockey India (@TheHockeyIndia) October 24, 2024
हरियाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये जन्मलेल्या राणीने वयाच्या 7व्या वर्षांपासून हॉकीचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. वडील हातगाडी ओढण्याचे काम करत असून देखील त्यांनी राणीला नेहमीच प्रोत्साहन दिले. राणीने सांगितले की, मी 7 व्या वर्षीपासून शाहबादमध्ये हॉकीचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. आमच्या येथून 50पेक्षा अधिक खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळत गेली व मी खेळत राहिले.
“हा एक अद्भुत प्रवास आहे. एवढे वर्ष भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेल, असे मला कधीच वाटले नाही. त्यामुळे मी माझ्या कारकिर्दीवर समाधानी आहे.”
-राणी रामपाल
राणी रामपालच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2018 साली ऑलिम्पिकचे रौप्य पदक मिळविले होते. खेळांच्या समारोपावेळी ती भारताची ध्वजवाहक देखील होती. राणीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाला 2020 मध्ये कांस्यपदक हुकले होते. राणीने भारतीय संघाला जागतिक स्पर्धेत भारताला चौथ्या स्थानापर्यंत मजल मारून दिली होती. तिच्या कामगिरीसाठी 2020 मध्ये तिला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार व त्याच वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.





