#FIHProLeague | रोमहर्षक लढतीत भारताचा इंग्लंडवर विजय
Updated On:

भुवनेश्वर – भारताच्या पुरुष संघाने एफआयएच प्रो हॉकी लीग स्पर्धेतील अत्यंत रोमहर्षक लढतीत इंग्लंडवर 4-3 असा विजय मिळवला. भारताचा इंग्लंडवर गेल्या दोन दिवसांतील सलग दुसरा विजय ठरला. या सामन्यात उपकर्णधार हरप्रीत सिंगने हॅट् ट्रिक साधली तर, कर्णधार मनप्रीत सिंगने एक गोल केला.
याआधीच्या सामन्यात भारताने 3-3 अशा पूर्ण वेळेतील बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडवर 3-2 अशी मात केली होती. भारतीय संघाचा यंदाच्या प्रो लीग हॉकीमधील दहा सामन्यांतील सहावा विजय ठरला.
भारतीय संघ 21 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावरील जर्मनीच्या खात्यावर 17 गुण असून त्यांनी भारतापेक्षा दोन सामने कमी खेळले आहेत.





