CNG Price : महागाईचा फटका ! सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ; जाणून घ्या नवे दर
CNG Price : आयजीएलने (IGL) सीएनजीच्या दरात ३ रुपये ८९ पैशांची वाढ केली

CNG Price : दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड म्हणजेच आयजीएलने (IGL) सीएनजीच्या दरात ३ रुपये ८९ पैशांची वाढ केली आहे. तर इतर तीन कंपन्यांच्या सीएनजीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
या वाढलेल्या किमती आजपासून लागू झाल्या आहेत. आता दिल्लीत एका किलो सीएनजीचा दर ८६.९८ रुपयांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे गेल्या चार महिन्यात सीएनजी जवळपास १० रुपयांनी महागला. दरम्यान, मुंबईसह महाराष्ट्रात दरवाढीची कोणतीही माहिती समोर आली नाही.
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा वाढल्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर संकट निर्माण झाले आहे. युद्धापूर्वीच्या तुलनेत एलएनजीच्या किमती आता जवळपास दुप्पट झाल्या आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेनुसार आणि वाढत्या मागणीनुसार सीएनजीच्या वापरातही लक्षणीय वाढ दिसून येत आहे. मे महिन्यानंतर आयजीएलने आता 29 ऑगस्ट रोजी सीएनजीच्या भावात वाढ केली आहे.
पश्चिम आशियातील संकट गडद झाल्याने होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या मालवाहतुकीवर परिणाम झाल्याने जुलैपासून किंमती दुप्पट वाढल्या आहेत.
नव्या दरवाढीनंतर, राजधानी दिल्लीत आता सीएनजीचा दर 86.98 रुपये प्रति किलो झाला आहे. तर नोएडा आणि गाझियाबादमध्ये हा दर 95.59 रुपये, गुरुग्राममध्ये 92.01 रुपये आणि मेरठमध्ये 95.47 रुपये प्रति किलो झाला आहे. वेगवेगळ्या राज्यांनुसार कर वेगवेगळा असल्यामुळे शहरांनुसार दरांमध्ये थोडा फरक दिसून येतो.
हेही वाचा :
Race 4 Film: ‘रेस 4’मधून सैफ अली खान आणि सलमान आऊट? ‘या’ अभिनेत्याची होणार वर्णी





