Sunetra Pawar : इतिहासाची पुनरावृत्ती! 64 वर्षांनंतर बारामतीला मिळाली दुसरी महिला आमदार
Sunetra Pawar : आता तब्बल ६४ वर्षांनंतर पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती झाले असून या मतदारसंघाला सुनेत्रा पवार यांच्या रुपाने महिला नेतृत्व लाभले आहे.

Sunetra Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांनी दणदणीत विजय मिळवून एक नवा इतिहास रचला आहे.
तब्बल २ लाख १८ हजार ९३० मतांच्या फरकाने त्या विजयी ठरल्या असून, बारामतीच्या दुसऱ्या महिला आमदार बनल्या आहेत. अजित पवार यांनी आठ वेळा बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
त्यांच्या निधनानंतर पोटिनिवडणुकीच्या निकालात बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांच्यावर विश्वास दाखवल्याने आता पुढील काळात बारामतीत सुनेत्रापर्व पाहायला मिळणार आहे.
१९६२ साली मालती शिरोळे (माई) यांच्या रूपाने बारामतीला पहिली महिला आमदार मिळाली होती. आता तब्बल ६४ वर्षांनंतर पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती झाले असून या मतदारसंघाला सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या रुपाने महिला नेतृत्व लाभले आहे.
कोण होत्या मालती शिरोळे?
मालतीबाई शिरोळे यांना त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे ‘माई’ म्हणून ओळखले जात असे. त्याचप्रमाणे सुनेत्रा पवार यांनाही गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीकर ‘वहिनी’ म्हणून संबोधतात. त्यामुळे ‘माई’नंतर ‘वहिनी’च्या रूपाने पुन्हा एकदा जनतेला आपलेपणाचा स्पर्श मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
१९६२ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या मालतीबाईंनी सहकार चळवळ आणि ग्रामीण महिलांच्या प्रश्नांवर प्रभावी काम केले. त्यानंतर १९६७ मध्ये शरद पवार यांनी बारामतीतून विजय मिळवत नव्या राजकीय युगाची सुरुवात केली. त्यानंतर या मतदारसंघावर पवार कुटुंबाचे वर्चस्व कायम राहिले.
अजित पवार यांनीही या मतदारसंघातून अनेकदा विजय मिळवत आपली मजबूत पकड कायम ठेवली. त्यांच्या निधनानंतर झालेल्या या पोटनिवडणुकीत आता सुनेत्रा पवार यांच्या हाती बारामतीचा कारभार आला आहे. Sunetra Pawar





