शिवभूमीत उमटल्या ऐतिहासिक पाऊलखुणा
दऱ्याखोऱ्यात घुमला निनाद : भाजे-लोहगड “हेरिटेज वॉक’ला पर्यटकांची मांदियाळी
कार्ला – महाराष्ट्राचा सांस्कृतिक व प्राचीन वारसा जपण्याच्या उद्देशाने संपर्क संस्था भाजे यांच्यावतिने संपर्क हेरीटेज वाक 2019 चे आयोजन करण्यात आले होते. सुमारे पाच ते सहा हजार पर्यटकांनी सहभागी होऊन या “हेरिटेज वॉक’चा आनंद घेतला.
या “हेरिटेज वॉक’ पददिंडीची सुरवात भाजे गावातून करण्यात आली. पददिंडीचे उद्घाटन मावळचे खासदार श्रीरंग बारणे, मावळचे आमदार सुनील शेळके, लोणावळा पोलीस उपविभागीय अधिकारी नवनीत कावत, सिनेअभिनेत्री गिरीजा ओक, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष रवींद्र भेगडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मावळ कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, संपर्क संस्था प्रमुख अमितकुमार बनर्जी, उमाराजे दाभाडे, राहुल गोरे, नवनाथ पायगुडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, भाजे सरपंच चेतन मानकर, लोहगड सरंपच नागेश मरगळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले.
या वेळी मावळचे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, शरदराव हुलावळे, माजी उपसभापती शांताराम कदम, बाळासाहेब भानुसघरे, रमेश पाळेकर, रत्ना बॅंनर्जी, किरण हुलावळे, नंदकुमार वाळूंज, नारायण पाळेकर, उपसरपंच दिलीप भालेराव, दिनेश ढगे, गोरक्ष दळवी, रघुनाथ मराठे, अशोक दळवी, अरुण काळे, तुषार दळवी, विजय तिकोणे, दीपक दळवी, सुनीता दळवी, मच्छिंद्र विखार, अश्विनी खाटपे, सविता शिवेकर, निकीता काकरे, लता कुंभार, पोलीस पाटील उज्वला आंभुरे, निकीता आंबेकर, बेबीताई हुलावळे, महादेव हिरवे, संजय जाधव, संजय खांडेभरड, रवींद्र वाघमारे, भरत भरणे, बाळासाहेब वाघमारे उपस्थित होते.
“हेरिटेज वॉक’ यशस्वीतेसाठी संपर्कचे प्रमुख विश्वस्त अमितकुमार बॅंनर्जी सर्व विश्वस्त पदाधिकारी सर्व संस्था पदाधिकारी सेवक विद्यार्थीं यांनी मोठे परिश्रम घेतले. उद्घाटन कार्यक्रम सूत्रसंचालन किरण हुलावळे, प्रदीप वाडेकर यांनी केले. संपर्क हेरिटेज वॉकमध्ये पाच ते सहा हजार पर्यटक उपस्थित असल्याने सुरक्षेतेसाठी लोणावळा ग्रामीण निरीक्षक प्रदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.
सांस्कृतिक वारसा जतन…
“वॉक’ला आलेल्या पाहुण्यांचे स्वागत ढोल-लेझीम वाजवत महिलांनी औंक्षण करत महाराष्ट्राचा साहसी खेळ दांडपट्टा व तलावार बाजी करत मिरवणूक काढण्यात आली. पौड येथील एक पर्यटक तरुण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा गळ्यात घालून पौड ते भाजे असे 65 किलोमीटर प्रवास करीत या “हेरिटेज वॉक’मध्ये सहभागी झाला होता. तसेच ठराविक अंतरावर परिसरातील इतिहासप्रेमी शालेय विद्याथी ऐतिहासिक जीवंत देखावे सादर करुन भारतीय सांस्कृतिक वारसा दर्शन घडवणारे महिला फेर धरत झिम्मा फुगड्यांचा खेळ, पोतरांजाचा खेळ, भजन, पोवाडे, बांगडा, राजस्थानी नृत्य, केरळी नृत्य सादरीकरण, जागरण गोंधाळाचा कार्यक्रम, महाराष्ट्राची सांस्कृतिक दाखवणारे कार्यक्रम, शिवाजी महाराज, मराठे मावळे यांच्या वेशभूषा धारण करत संस्कृतीचे दर्शन घडवले जात होते. मार्गांवर विविध ठिकाणी महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ, मक्याचे कणीस, वडापाव यासारखे स्टॉल लावण्यात आल्याने खाद्य पदार्थांचा इतिहास प्रेमींना आस्वाद घेता येत होता.





