भारतीय रूपयाची ऐतिहासिक घसरण
Updated On:

नवी दिल्ली – चलन बाजारात आज भारतीय रूपयाची पुन्हा विक्रमी पातळीवर घसरण होऊन रूपयाची किंमत डॉलर्सच्या तुलनेत 78 रूपये 29 पैसे इतकी झाली आहे.
आज बाजार सुरू होताच रूपया 36 पैशांनी घसरला. शुक्रवारीही रूपयाने मोठी गटांगळी खाल्ली होती. त्या दिवशी रूपयाची किंमत 19 पैशांनी घसरून ती 77 रूपये 93 पैसे इतकी झाली होती.
या घसरणीबद्दल बोलताना तज्ज्ञांनी सांगितले की, भारतीय शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदार आपली गुंतवणूक मोठ्या संख्येन काढून घेत आहे हे त्याचे एक प्रमुख कारण मानले जात असून दुसरे डॉलर्सची किंमत मजबूत झाल्यानेही रूपयाची किंमत घसरल्याचे मानले जात आहे. ही स्थिती नजिकच्या भविष्यात सुधारण्याची शक्यता अगदीच कमी आहे असेही मानले जात आहे.





