Hingoli: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हिंगोली जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्यासाठी अनिल पतंगे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी मुंबई येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. या नियुक्तीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसला नवी उभारी मिळेल, अशी अपेक्षा पक्षातून व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणुका आणि पक्षविस्ताराच्या दृष्टीने पतंगे यांचा अनुभव पक्षाच्या कामी येईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. हेही वाचा -वसमतच्या तलाव दुरुस्तीत सापडले प्राचीन भुयार; गुप्तधनाच्या चर्चेने शहरात उत्सुकता या कार्यक्रमास आमदार राजू नवघरे, संजय दराडे, रवींद्र गडदे, माजी नगराध्यक्ष राजू देशमुख, कैलास देशमुख, अशोक सिरामे, उमेश देशमुख, संदीप बहिरे, संचित गुंडेवार, सतीश टापरे, उत्तमराव पोले, विजय डोखळे, संदीप देशमुख, गजानन मानकर, संतोष मुळे, संतोष पोले, पंकज जोगे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. नियुक्तीचे वृत्त समजताच कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. “सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जिल्ह्यात पक्षवाढीसाठी कटिबद्ध राहू,” अशी प्रतिक्रिया पतंगे यांनी नियुक्तीनंतर दिली.