हिंदूंनी 4 मुलं जन्माला घाला, 2 आरएसएसला अन् 2 ‘विहिंप’ला द्या : साध्वी ऋतंभरा

Updated On:
हिंदूंनी 4 मुलं जन्माला घाला,  2 आरएसएसला अन् 2 ‘विहिंप’ला द्या : साध्वी ऋतंभरा

कानपूर – साध्वी ऋतंभरा यांचे एक वक्तव्य खूप चर्चेत आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे विश्व हिंदू परिषदेच्या एका कार्यक्रमात साध्वी ऋतंभरा म्हणाल्या की, आता प्रत्येक हिंदूला 4 मुले झाली पाहिजेत. यापैकी दोन बालकांना राष्ट्र उभारणीच्या योगदानासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) आणि उर्वरित 2 विश्व हिंदू परिषद यांच्याकडे सुपूर्द करण्यात यावे.

कानपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) रामोत्सवाच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले.

लोकांना संबोधित करताना त्या म्हणाल्या की, हिंदू समाजातील जोडप्यांनी 4 मुलांना जन्म दिल्यास ते आरएसएसचे स्वयंसेवक होतील. बजरंग दलाचे बजरंगदेव बनतील आणि विश्व हिंदू परिषदेचे समर्पित कार्यकर्तेही बनतील. तसेच ते भारताची धूळ आपल्या कपाळावर लावून धन्य होतील. त्यानंतर माता भारती अखंडतेच्या सिंहासनावर विराजमान होईल, असे साध्वी ऋतंभरा म्हणाल्या.

लोकसंख्या नियंत्रण कायद्याचा सरकारने विचार करावा, अशी मागणी परमशक्ती पीठाच्या संचालिका साध्वी ऋतंभरा यांनी माध्यमांशी बोलताना केली. त्या म्हणाले की, आता देशात समान आचारसंहिता लागू झाली पाहिजे.

आणखी संबंधित बातम्या

Mohan Bhagwat : जगाच्या कल्याणासाठी भारताची परंपरा महत्त्वाची प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे; मोहन भागवत यांनी व्यक्त केले मत

2026-10-07 18:15:58

Mohan Bhagwat : जगाच्या कल्याणासाठी भारताची परंपरा महत्त्वाची प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे; मोहन भागवत यांनी व्यक्त केले मत

Priyank Kharge : 'धर्माच्या नावाखाली अफरातफर करतो संघ'; प्रियांक खर्गे यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला

2026-10-05 16:47:36

Priyank Kharge : 'धर्माच्या नावाखाली अफरातफर करतो संघ'; प्रियांक खर्गे यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला

Mohan Bhagwat: ‘हिंदू राष्ट्र’ म्हणजे काय? ; लंडनमध्ये मोहन भागवत यांनी स्पष्ट केली RSSची भूमिका

2026-09-07 12:42:13

Mohan Bhagwat: ‘हिंदू राष्ट्र’ म्हणजे काय? ; लंडनमध्ये मोहन भागवत यांनी स्पष्ट केली RSSची भूमिका

Mohan Bhagwat: आरएसएसच्या कार्यक्रमाला लंडनमध्येही विरोध; कार्यक्रमासाठी जागा न देण्याची संघटनांची मागणी

2026-09-05 11:09:39

Mohan Bhagwat: आरएसएसच्या कार्यक्रमाला लंडनमध्येही विरोध; कार्यक्रमासाठी जागा न देण्याची संघटनांची मागणी

Politics News : मोदींच्या वारसदारावरून भाजपमध्ये खळबळ? खासदाराचा मोठा दावा

2026-09-04 15:55:50

Politics News : मोदींच्या वारसदारावरून भाजपमध्ये खळबळ? खासदाराचा मोठा दावा