“औरंगजेबला अधिकृतपणे ‘क्रूर शासक’ म्हणून घोषित करा” ; हिंदू सेनेची गृहमंत्री अमित शहांना पत्राद्वारे मागणी

Hindu Sena on Aurangzeb। हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी भारत सरकारकडे मुघल शासक औरंगजेबला अधिकृतपणे ‘क्रूर शासक’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून औरंगजेबाच्या नावावर असलेल्या सर्व रस्त्यांची आणि ठिकाणांची नावे बदलण्याचे आणि त्यांची कबर खोदून त्यांचे अवशेष अरबी समुद्रात फेकण्याचे आवाहन केले आहे.
हिंदू सेनेचे प्रमुख विष्णू गुप्ता यांनी हे पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी, “औरंगजेबने त्याच्या कारकिर्दीत हिंदू आणि इतर धर्माच्या लोकांवर अत्याचार केले. त्याने आपल्या भावांची हत्या करून सिंहासन बळकावले आणि वडील शाहजहान यांना कैद केले. त्याने त्याच्या मुलींचे लग्नही होऊ दिले नाही. औरंगजेबाने गुरु तेग बहादूर, गोकुळ जाट आणि छत्रपती संभाजी महाराज यांची निर्घृण हत्या केली. याशिवाय, त्याने अनेक हिंदू मंदिरे आणि मठ नष्ट केले आणि बिगर मुस्लिमांवर जझिया कर लादला.” असे म्हटले.
हिंदू सेनेच्या पत्रात लादेनचा उल्लेख Hindu Sena on Aurangzeb।
गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात हिंदू सेना प्रमुखांनी म्हटले आहे की, औरंगजेबाच्या असहिष्णुता आणि धर्मांधतेमुळे कोट्यवधी लोकांना त्रास सहन करावा लागला. भारत हा एक शांतताप्रिय आणि बहुसांस्कृतिक देश आहे, जिथे अशा व्यक्तीचा गौरव केला जाऊ नये. अमेरिकेचे उदाहरण देत ते म्हणाले की, ज्याप्रमाणे ओसामा बिन लादेनचे अवशेष समुद्रात फेकले गेले, त्याचप्रमाणे औरंगजेबाची कबर काढून तिथे गरिबांसाठी शाळा किंवा रुग्णालय बांधले पाहिजे.” अशी मागणी त्यांनी केली.
हिंदू सेनेच्या मागण्या Hindu Sena on Aurangzeb।
* औरंगजेबाला क्रूर शासक घोषित करावे आणि त्याची स्तुती करणे हा दंडनीय गुन्हा ठरवावा.
* औरंगजेबाच्या नावावर असलेल्या सर्व रस्त्यांची आणि ठिकाणांची नावे बदलली पाहिजेत.
* औरंगजेबाची कबर खोदून त्याचे अवशेष नष्ट करावेत आणि त्या ठिकाणी गरिबांसाठी शाळा किंवा रुग्णालय बांधावे.
औरंगजेबाने सुमारे ५० वर्षे राज्य केले
औरंगजेब (१६५८-१७०७) यांनी सुमारे ५० वर्षे भारतावर राज्य केले. त्याच्या कारकिर्दीत त्याने धार्मिक भेदभाव आणि कट्टरतावादाला प्रोत्साहन दिले. अनेक इतिहासकारांच्या मते, औरंगजेबाने सत्ता मिळवण्यासाठी आपल्या कुटुंबालाही सोडले नाही. त्याच्या आदेशामुळे अनेक मंदिरे उद्ध्वस्त झाली, अनेक राज्यांच्या राजांना ओलीस ठेवण्यात आले आणि सामान्य जनतेवर धार्मिक कर लादण्यात आले. या मागणीवर सरकारला त्वरित कारवाई करण्याचे आवाहन हिंदू सेनेने केले आहे.





