मथुरा :- श्रीकृष्ण जन्मभूमी संकुलातील शाही मशीद ईदगाह येथे हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी जात असताना अखिल भारत हिंदू महासभेच्या एका नेत्याला मंगळवारी अटक करण्यात आली. संघटनेच्या इतर सात-आठ नेत्यांनाही शहरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत त्यांच्या घरात नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. बाबरी मशीद पाडण्यात आल्याच्या दिनानिमित्त अखिल भारत हिंदू महासभेने शाही मशीद ईदगाहमध्ये हनुमान चालिसाचे पठण करण्याचे आवाहन केले होते. पोलिसांनी अखिल भारत हिंदू महासभेचे आग्रा प्रदेश प्रभारी सौरभ शर्मा यांना संकुलातील ईदगाह मशिदीकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना अटक केली. हिंदू महासभेच्या आवाहनानंतर ईदगाह परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला होता. येथील कायदा व सुव्यवस्था कोणालाही बिघडू दिली जाणार नाही, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक शैलेशकुमार पांडे यांनी सांगितले. सोशल मीडियावरही कडक नजर ठेवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. Chhattisgarh : 23 फूट उंच भिंतीवर चढून दोन कैदी फरारी; यातील एका कैदीवर… या संघटनेने गेल्या वर्षीही अशीच मागणी केली होती; परंतु जिल्हा प्रशासनाने त्यांची योजना हाणून पाडली होती.