पुणे | मॉडर्न हायस्कूलमध्ये हिंदी दिवस उत्साहात
Updated On:

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गणेशखिंड येथील मॉडर्न हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये हिंदी दिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे बहारदार कार्यक्रम सादर केले.
त्यात हिंदी दिवसाचे महत्त्व सांगणाऱ्या नाटिका, कथाकथन, नृत्य, समूहगीत, दोहे गायन, देशभक्ती गीत आदींचा समावेश होता. त्यातून हिंदी भाषेवर असलेले प्रेम आणि तयारी दिसून आली. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका रोहिणी काळे यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका वर्षा पाचारणे यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी साक्षी खाडे व श्रुती साळवे यांनी केले. हिंदी विभागप्रमुख हरीश गुट्टे, उपप्रमुख अर्चना उंडे, रुपाली जोशी केसकर व सर्व हिंदी शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी केला.





