Heena Khan : ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिनाची बॅायफ्रेन्ड अशी घेतोय काळजी; अभिनेत्रीची भावनिक पोस्ट, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात रॉकीसारखी व्यक्ती असावी

अभिनेत्री हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून ती या आजाराशी झुंज देत आहे. ती कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजवर असून, अशा खडतर परिस्थितीमध्ये तिचा बॅायफ्रेंन्ड राॅकी जैस्वाल तिची काळजी घेत आहे. तो तिचे या आजाराशी लढण्यासाठी मनोबल वाढवत आहे. तसेच तिची सेवा देखील करत आहे. नुकतीच हिना खानने रॅाकीसाठी सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये तिने हृदयाला स्पर्श करणाऱ्या गोष्टी लिहिल्या आहेत.
मी ओळखत असलेल्या सर्वोत्तम व्यक्तीसाठी.. जेव्हा मी टक्कल केलं, तेव्हा त्यानेसुद्धा टक्कल केलं आणि जेव्हा माझे पुन्हा वाढायला लागले, तेव्हाच त्याने त्याचे केस वाढू दिले. माझ्या मनाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीसाठी, जो मला नेहमी म्हणतो की ‘मी तुझ्या पाठिशी आहे.’ हार मानण्याची शंभर कारणं असतानाही माझ्या बाजूने खंबीरपणे उभं राहणाऱ्या या व्यक्तीसाठी… या निस्वार्थी व्यक्तीला फक्त कसं टिकून राहायचं हेच माहीत आहे, अशी पोस्ट हिनाने लिहिली आहे.
प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात रॉकीसारखी व्यक्ती असावी
कोविड झाला तेव्हाही रॉकी मास्क घालून माझ्या जवळच असायचा. त्या काळात रॉकीने सतत माझी पूर्ण काळजी घेतली. आजही तू माझ्यासोबत आहेस, माझी काळजी घेत आहेस. या प्रवासाने मला खूप काही शिकवले, तू खरोखरच माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम भाग आहेस. जर मी रॉकीला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला असेल तर मला खेद वाटतो. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात रॉकीसारखी व्यक्ती असावी, जी तिच्यावर बिनशर्त प्रेम करेल आणि प्रत्येक कठीण प्रसंगी तिच्या पाठीशी उभी असेल. या कठीण काळातही आम्ही एकत्र हसलो आणि अश्रू शेअर केले असल्याचे भावनिक गोष्ट देखील हिना खाने या पोस्टमध्ये लिहिली आहे.





