Himanta Biswa Sarma। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्यात सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध होत असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही मुख्यमंत्र्यांनी एकमेकांवर तुष्टीकरणाचे राजकारण केल्याचा आरोप केला. ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आसाममध्ये भाजपच्या फुटीरतावादी अजेंड्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आसाममधील लोक त्याचा जोरदारपणे सामना करतील. मी प्रत्येक निर्भय नागरिकासोबत उभी आहे जो त्यांची भाषा, ओळख आणि त्यांच्या लोकशाही हक्कांच्या प्रतिष्ठेसाठी लढत आहे.” असे म्हणत राज्य सरकारवर टीका केली. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींच्या विधानावर काय म्हटले? Himanta Biswa Sarma। ममता बॅनर्जी यांचे हे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानानंतर आले आहे. ज्यात त्यांनी म्हटले होते की, “पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) ने राजकीय कारणांमुळे घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी एक यंत्रणा तयार केली आहे.” प्रत्यक्षात पंतप्रधान मोदींनी टीएमसीच्या आरोपांना उत्तर दिले, ज्यामध्ये असे म्हटले होते की,”भाजपशासित राज्यांमध्ये बंगाली भाषिक स्थलांतरित कामगारांना बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित म्हणून चुकीचे वर्णन केले जात आहे.” ममता बॅनर्जी म्हणाल्या की,”देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी बंगाली, तसेच आसाममध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी देखील हीच भाषा आहे. सर्व भाषा आणि धर्मांचा आदर करणाऱ्या लोकांना त्यांची मातृभाषा जपल्याबद्दल छळाची धमकी देणे हे भेदभावपूर्ण आणि असंवैधानिक आहे.” ममता यांच्या आरोपांवर हिमंता बिस्वा सरामांचे उत्तर Himanta Biswa Sarma। ममता बॅनर्जी यांच्या पोस्टनंतर, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले की, त्यांचे सरकार आसामची ओळख टिकवून ठेवण्यासाठी निर्णायकपणे काम करत आहे, परंतु पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने एका समुदायाचे तुष्टीकरण करून आणि सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीवर मौन बाळगून बंगालच्या भविष्याशी तडजोड केली आहे.”असे म्हणत त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. तसेच त्या पुढे म्हणाल्या कि, “दीदी (ममता बॅनर्जी), मी तुम्हाला आठवण करून देतो की आसाममध्ये आम्ही आमच्या स्वतःच्या लोकांशी लढत नाही आहोत. आम्ही निर्भयपणे सीमेपलीकडून होणाऱ्या अनियंत्रित घुसखोरीचा विरोध करत आहोत, ज्यामुळे आधीच एक भयानक लोकसंख्याशास्त्रीय बदल झाला आहे. त्यांनी असेही म्हटले की, अनेक जिल्ह्यांमध्ये हिंदू आता त्यांच्याच भूमीवर अल्पसंख्याक बनण्याच्या मार्गावर आहेत.” असे म्हणत त्यांच्यावर पलटवार केला.