Jamkhed News : जामखेडमध्ये ‘अतिक्रमण हटाव’ मोहिमेवरून वाद पेटला! ‘गरीबांच्या टपऱ्यांवर बुलडोझर, मग मोठ्या इमारतींना अभय का?’ : अवधूत पवार यांचा रोखठोक सवाल
Jamkhed News : जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डी (NH 548-D) वरील प्रशासनाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेवरून आता राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठे वादळ निर्माण झाले आहे.

Jamkhed News : जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डी वरील अतिक्रमण हटाव मोहिमेने आता राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठे वादळ उठवले आहे. या मोहिमेत प्रशासनाकडून दुटप्पी भूमिका घेतली जात असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी केला आहे. (Jamkhed News)
“गरीबांच्या टपऱ्या आणि छोट्या गाळ्यांवर तत्परतेने कारवाई केली जात असताना, धनदांडग्यांच्या मोठ्या इमारती व व्यावसायिक अतिक्रमणांकडे प्रशासन डोळेझाक का करत आहे?” असा रोखठोक सवाल उपस्थित करत त्यांनी सर्वांना समान न्याय देण्याची मागणी केली आहे. (Jamkhed News)
या संदर्भात अवधूत पवार यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारी धाव घेत प्रशासनाला निवेदन सादर केले. निवेदनात त्यांनी पारदर्शक आणि भेदभावविरहित कारवाईची जोरदार मागणी केली. (Jamkhed News)
मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास १५ ऑक्टोबरपासून जामखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा कडक इशारा त्यांनी दिला होता. मात्र, प्रशासनाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी (उपजिल्हाधिकारी) दादासाहेब गिते यांनी केलेल्या मध्यस्थी आणि विनंतीनंतर हे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे. (Jamkhed News)
‘समर्थ हॉस्पिटल’जवळ कारवाई थांबल्याचा गंभीर आरोप
शासकीय दूध डेअरी परिसरापासून प्रशासनाने अतिशय आक्रमकपणे ही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती. मात्र, ही कारवाई समर्थ हॉस्पिटलजवळ येताच अचानक थंडावली, असा थेट आरोप अवधूत पवार यांनी केला आहे. (Jamkhed News)
समर्थ हॉस्पिटल ते खर्डा चौक या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावरील अतिक्रमणांवरही विनाभेदभाव समान निकषांनुसार तत्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. (Jamkhed News)
या मोहिमेदरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यांवरही हातोडा पडल्याने शेतकरी, कष्टकरी आणि छोट्या व्यावसायिकांच्या रोजगारावर गंडांतर आले आहे. “अतिक्रमण हटवण्याला आमचा अजिबात विरोध नाही; परंतु कारवाई करताना गरीब आणि श्रीमंत असा पक्षपात केला जाऊ नये, प्रशासनाचा बुलडोझर सगळ्यांवर समान चालला पाहिजे,” असे पवार यांनी स्पष्ट केले. (Jamkhed News)
दुसऱ्या बाजूला, निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी प्रशासनाची बाजू स्पष्ट करताना सांगितले की, “जामखेड नगरपरिषद हद्दीतील ही मोहीम माननीय उच्च न्यायालयाच्या थेट आदेशानुसार राबवली जात आहे. (Jamkhed News)
त्यामुळे यामध्ये कोणताही पक्षपात असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.” सर्व अतिक्रमणधारकांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न करता स्वतःहून अतिक्रमणे हटवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. (Jamkhed News)
प्रशासनाच्या या आश्वासनानंतर समर्थ हॉस्पिटल ते खर्डा चौक दरम्यानच्या बड्या अतिक्रमणांवर खरंच कारवाईचा हातोडा पडतो का? आणि जामखेडकरांना ‘समान न्याया’चा अनुभव मिळतो का? याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. (Jamkhed News)
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरूच राहील
“जामखेड शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानुसार सुरू आहे. न्यायालयाच्या अवमानाची कोणतीही बाब घडणार नाही, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिक व व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे.”
– दादासाहेब गिते (निवासी जिल्हाधिकारी)१५ ऑक्टोबरचे आमरण उपोषण तूर्त स्थगित!
“समर्थ हॉस्पिटलजवळ कारवाई अचानक थांबल्याने आम्ही १५ ऑक्टोबरपासून उपोषणाचा इशारा दिला होता. निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी कारवाई अविरत व निष्पक्षपणे सुरू ठेवण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन तूर्त स्थगित केले आहे. मात्र, बड्या अतिक्रमणांवर कारवाई होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.”
-अवधूत पवार (सामाजिक कार्यकर्ते)

