कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना उच्च न्यायालयाचा दिलासा
Updated On:

बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते बी.एस.येडियुरप्पा यांना पॉक्सो प्रकरणात दिलासा मिळाला. येडियुरप्पा यांच्यावरील आरोपांची दखल घेणारा आदेश कनिष्ठ न्यायालयाने दिला. त्या आदेशाला कर्नाटक उच्च न्यायलयाकडून स्थगिती देण्यात आली. तसेच, येडियुरप्पा यांना बजावण्यात आलेल्या समन्सलाही स्थगिती दिली.
एका महिलेच्या तक्रारीवरून वर्षभरापूर्वी येडियुरप्पा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या महिलेने तिच्या १७ वर्षीय कन्येवर येडियुरप्पा यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला. त्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची कनिष्ठ न्यायालयाने दखल घेतली. तसेच, येडियुरप्पा यांना १५ मार्चला हजर राहण्यास सांगितले. त्या आदेशाला येडियुरप्पा यांनी आव्हान दिले. त्यानंतर उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश जारी करत येडियुरप्पा यांना दिलासा दिला.





