Mumbai High Alert : महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी; सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. भारताच्या जम्मू, जैसलमेर आणि अमृतसरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे प्रयत्न भारताने हाणून पाडले आहेत. यानंतर भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. जम्मू, पठाणकोट, जैसलमेर, पंजाबमधील होशियारपूरवर पाकिस्तानने ड्रोन हल्ला केला. त्यानंतर महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईत अनेकदा बॉम्बस्फोट आणि दहशतवादी हल्लेही घडविण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांवर मोठी जबाबदारी असते. मुंबई पोलीसही सर्वत्र तैनात असून सुरक्षा यंत्रणा नेहमीच अलर्ट असते. मुंबईत प्रसिद्ध ठिकाणे किंवा गर्दीची ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याची धमकीही दिली जाते, त्यामुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे. धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानक, गर्दीच्या ठिकाणाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आला आहे.
भारत पाकिस्तान तणाव चिघळला असून महाराष्ट्र प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला असून मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात येणार आहे. फक्त आप्तकालीन परिस्थिती असेल तरच काही सुट्या देण्यात येणार आहे. २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यानंतर मुंबई कायमच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे, त्यामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.





