झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केली मंत्र्यांची विभागणी ; कोणता विभाग कोणाला मिळाला? वाचा

Hemant Soren Cabinet Portfolio । झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मंत्र्यांची विभागणी केली आहे. सोरेन यांनी काल मंत्रिमंडळाचा विस्तार केला आणि 11 नेत्यांना स्थान दिले. अर्थ, कृषी यांसारखी महत्त्वाची खाती मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसकडे दिली आहेत. झामुमोचे सुदिव्य कुमार सोनू यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पेयजल आणि स्वच्छता खाते योगेंद्र प्रसाद, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय कल्याण विभाग चमरा लिंडा यांच्याकडे, शालेय शिक्षण आणि साक्षरता खाते रामदास सोरेन यांच्याकडे, परिवहन खाते दीपक बिरुवा यांच्याकडे आणि जलसंपदा खाते हाफिजल हसन यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. . आरजेडी कोट्यातून मंत्री संजय प्रसाद यादव यांच्याकडे कामगार, नियोजन, प्रशिक्षण आणि कौशल्य कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
काँग्रेस नेत्यांना कोणती जबाबदारी आली? Hemant Soren Cabinet Portfolio ।
राधा कृष्ण किशोर- अर्थ मंत्रालय
इरफान अन्सारी- आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि कुटुंब कल्याण विभाग
शिल्पी नेहा तिर्की- कृषी, पशुसंवर्धन आणि सहकार विभाग
दीपिका पांडे सिंग- ग्रामीण विकास
सोरेन यांनी 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ Hemant Soren Cabinet Portfolio ।
JMM नेते हेमंत सोरेन यांनी 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गृहमंत्रालयाची जबाबदारी त्यांनी स्वत:कडे ठेवली आहे. हेमंत सोरेन यांनी आपल्या सरकारमध्ये 6 नवीन चेहऱ्यांचा समावेश केला असून दीपिका पांडे सिंग, इरफान अन्सारी, दीपक बिरुआ आणि रामदास सोरेन यांना दुसऱ्यांदा आणि हफिजुल हसन यांना तिसऱ्यांदा मंत्रीपद मिळाले आहे. स्टीफन मरांडी यांनी विधानसभेचे ‘प्रोटेम स्पीकर’ म्हणून शपथ घेऊन शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली.
विधानसभा निवडणुकीत JMMने 43 जागा लढवल्या आणि 34 जागा जिंकल्या. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 16 जागा मिळाल्या आहेत. लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) सहा जागांवर निवडणूक लढवली होती, त्यापैकी चार जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले. तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) (सीपीआय-एमएल) लिबरेशनने दोन जागा जिंकल्या आहेत. सीपीआय (एमएल) लिबरेशनने यापूर्वी जाहीर केले होते की ते मंत्री परिषदेचा भाग नसतील.





