राज्यातल्या लाडक्या बहिणांना मिळणार आता दरमहा २५०० रु. ; हेमंत सोरेन यांची मोठी घोषणा

Hemant Soren । हेमंत सोरेन यांनी काल झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांनी चौथ्यांदा शपथ घेतली.या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे इतर नेते उपस्थित होते. दरम्यान, त्यांच्या या सोहळ्यानंतर हेमंत सोरेन यांनी लगेच राज्यातील महिलांसाठी मोठी घोषणा केली. ‘मैय्या सन्मान योजने’च्या रकमेत भरघोस वाढ करण्याचा यावेळी त्यांनी निर्णय घेतला. महिलांना दिली जाणारी रक्कम वाढवून ती 2500 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे हेमंत सोरेन यांनी यावेळी म्हटले.
राज्यातील लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार Hemant Soren ।
झारखंडच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांचा शपथविधी सोहळा न होता केवळ काल हेमंत सोरेन यांचाच शपथविधी पार पडला. झारखंडच्या मंत्रिमंडळाची संख्या 12 इतकी आहे. राज्यपाल संतोष गंगवार यांनी रांचीतील मैदानावरील आयोजित कार्यक्रमात हेमंत सोरेन यांना पद आणि गोपनियतेची पथ दिली.
शपथविधीनंतर हेमंत सोरेन यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत मैय्या सन्मान योजनेतील रक्कम एक हजार रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला असून महिलांना आता दरमहा 2500 रुपये मिळणार आहेत. डिसेंबर महिन्यापासून महिलांना 2500 रुपये मिळतील. केंद्र सरकारकडून 1.36 लाख कोटी रुपये मिळवण्यासाठी कायदेशीर पर्यायांचा वापर करणार असल्याचे संकेत देखील हेमंत सोरेन यांनी दिले. महसूल विभागातर्फे खाणींवरील कर वाढवण्याचा निर्णय देखील घेतला गेला आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार डिसेंबर महिन्यात होणार ? Hemant Soren । Hemant Soren ।
हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. हेमंत सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार स्टीफन मरांडी यांना प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्त केलं आहे. ते 9 ते 12 डिसेंबर दरम्यान विधानसभेचं विशेष सत्र आयोजित करतील. झारखंडच्या विधानसभेची सदस्यसंख्या 81 इतकी आहे.इंडिया आघाडीला झारखंडमध्ये 56, भाजपला 24 आणि इतरांना 1 जागेवर विजय मिळाला होता.झारखंडमधील शपथविधी सोहळ्यापूर्वी हेमंत सोरेन यांनी दिल्लीचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.
हेही वाचा
“उद्धव ठाकरे रात्रीच्या अंधारात देशातून पळून जातील” ; शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा





