Hemant Dhome Social Media Post : मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याचा ‘फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच मोठ्या पडद्यावर रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हेमंतचेच दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटातील सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, अमेय वाघ यांच्या भूमिकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. आता या चित्रपटाच्या निमित्ताने हेमंतने अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
हेमंत ढोमे आणि सिद्धार्थ चांदेकरने अनेक चित्रपटांमध्ये एकमेकांसोबत काम केले आहे. ‘फसक्लास दाभाडे’च्या निमित्तानेही दोघांनी एकत्र काम केले. दोघांचा हा तिसरा एकत्र प्रोजेक्ट होता. यासोबतच, त्यांनी ‘फसक्लास दाभाडे’च्या माध्यमातून यशस्वी चित्रपटांची हॅट्रिक देखील केली.
View this post on Instagram
या चित्रपटाच्या निमित्ताने हेमंतने सिद्धार्थसाठी खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये हेमंतने लिहिले की, ‘दोन दोस्तांची हॅट्रिक!!! झिम्मा, झिम्मा 2 आणि आता फसक्लास दाभाडे! आधी कबीर आणि आता किरण! माझा फेवरेट किरण दाभाडे… पण कबीर पण बिचारा छान होता… जाऊदे ना तूच माझा फेवरेट! प्रेक्षकांना तू आपलसं केलंस आणि प्रेक्षकांनी तुझ्यावर भरभरून प्रेम केलं! मी कंसातील वाक्य लिहायची आणि तू ती पडद्यावर दाखवायची! असंच काम करत राहू, बाकी काय होतंय की आपोआप! बाकी भेटून, बसून बोलूच! पण आपली हॅट्रिक सेलीब्रेट करूया.’
दरम्यान, ‘फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट 24 जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली. चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंतनेच केले असून, यात अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, निवेदिता सराफ, उषा नाडकर्णी, मिताली मयेकर, राजसी भावे, हरीश दुधाडे अशी स्टार कास्ट आहे.