चाहतीला दिलेल्या वागणुकीमुळे हेमा मालिनी ट्रोल; व्हिडिओ व्हायरल…

Hema Malini Troll | बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांचा भारतासह जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. त्यांची ‘ड्रिम गर्ल’ अशी देखील ओळख आहे. सध्या त्यांचा एका कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात त्यांनी एका चाहतीला दिलेल्या वागणुकीमुळे नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
उत्तर प्रदेशातील एका नवरात्रीच्या कार्यक्रमात हेमा मालिनी यांनी हजेरी लावली होती. प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित असलेल्या हेमा मालिनींना पाहून एक चाहती कॅमेरा घेऊन सेल्फीसाठी त्यांच्या जवळ गेली. पण, हेमा यांनी तिच्याकडे पाहणे टाळले. तसेच कॅमेऱ्याकडे पाहून वेगळे हावभाव केले. त्यांच्या या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. फोटो काढण्यासाठी आलेल्या चाहतीला वाईट वागणूक दिल्यानं त्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्या आहेत. Hema Malini Troll |
View this post on Instagram
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं. एका युजरनं कमेंट केली, “जर हेमा मालिनींना चाहत्यांसोबत फोटो काढताना इतका त्रास होत असेल, तर त्या सार्वजनिक आमंत्रणे का स्वीकारतात?” तर दुसऱ्याने “या जया बच्चनची कॉपी आहेत”, असे म्हंटले आहे. तर काहींनी त्यांचे समर्थन केले आहे. एकाने लिहिलं, “फोटो किंवा व्हिडीओ घेण्यापूर्वी परवानगी मागा, नाहीतर असंच उत्तर मिळतं.” सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. Hema Malini Troll |
हेही वाचा:
आदिती तटकरेंचा लाडक्या बहिणींना दिलासा, E-KYC प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार…





