हेमा मालिनी ते कंगणा…; आतापर्यंत भाजपकडून कोणत्या सिनेस्टारला मिळाली उमेदवारी?

BJP Candidates List| लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पार्टीकडून आतापर्यंत पाच उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात काहींचा पत्ता कट करत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपकडून बॉलीवूडच्या अनेक कलाकारांना देखील संधी देण्यात आली आहे. यंदा भाजपकडून 400 पारचा नारा देण्यात आला आहे. त्यादृष्टीने भाजपने कंबर कसली आहे. यातच बॉलीवूडच्या काही स्टार कलाकारांना रिंगणात उतरवले आहे.
स्मृती इराणी आणि हेमा मालिनी
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या उत्तर प्रदेशातील अमेठीमधून निवडणूक लढवणार असून त्या या मतदारसंघातील विद्यमान खासदारही आहेत. स्मृती इराणी राजकारणात येण्यापूर्वी त्या अभिनेत्री आणि टेलिव्हिजन निर्मात्या होत्या.
याशिवाय बॉलीवूडची ड्रीम गर्ल म्हणजेच हेमा मालिनी उत्तर प्रदेशातील मथुरा येथून पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्या सलग 2014 आणि 2019मध्ये या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. आता त्यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे.
भोजपुरी स्टारला उमेदवारी BJP Candidates List|
भाजपने पहिल्या यादीत ईशान्य दिल्लीतून भोजपुरी स्टार मनोज तिवारीला उमेदवारी दिली होती. ते या जागेवरून विद्यमान खासदार आहेत. तर आझमगडमधून भोजपुरी चित्रपट गायक, अभिनेता दिनेशलाल यादव ऊर्फ ‘निरहुआ’ यांना पक्षाने तिकीट दिले आहे. निरहुआ यांचा सामना धर्मेंद्र यादव यांच्याशी होणार आहे. आझमगडचे विद्यमान खासदार निरहुआ यांनी पोटनिवडणुकीत धर्मेंद्र यादव यांचा पराभव केला होता.
पश्चिम बंगालमधील हुगळी मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार लॉकेट चॅटर्जी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी यापूर्वी बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर केरळमधील त्रिशूरमधून प्रसिद्ध गायक आणि दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेते सुरेश गोपी यांना भाजपने तिकीट दिले आहे.
कंगना राणावत BJP Candidates List|
मागील अनेक दिवसांपासून अभिनेत्री कंगना निवडणूकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा होती. अखेर काल यावर शिक्कामोर्तब झाला. भाजपाने रविवारी जाहीर केलेल्या यादीत ते स्पष्ट झाले आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. उमेदवारी दिल्यानंतर तिने पक्षश्रेष्ठींचे आभार देखील मानले होते.
अरुण गोविल
कंगणासह भाजपच्या पाचव्या यादीत अरुण गोविल यांच्या नावाचा देखील समावेश आहे. अरुण गोविल यांना उत्तर प्रदेशातील मेरठ या मतदारसंघातून भाजपनं तिकीट दिलंय. त्यामुळे आता अरुण गोविल देखील भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट झालं. रामायण मालिकेतील प्रभू श्री रामाच्या भूमिकेमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली.
हेही वाचा:
पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची कधी आहे शेवटची तारीख? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक





