राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची आज सकाळी राजभवनात जावून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीने मदत करण्यासाठी निधी तत्काळ वितरित करण्यात यावा, अशी मागणी यावेळी फडणवीय यांनी केली. दरम्यान, त्यांच्या मागणीचा विचार करू तसेच लगेच कारवाई करण्याचे आश्वासनदेखील यावेळी राज्यपाल महोदयांनी मान्य केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
\n\n\nमुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब रुग्णांना दिलासा दिला जातो. या निधीचे संचालन राज्यपाल कार्यालयातर्फे करण्यात यावे. पण एकही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे, अशी विनंती केली. मा. राज्यपाल महोदयांनी यावर सुद्धा तत्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले.
\n— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 15, 2019
\nमुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब रुग्णांना दिलासा दिला जातो. या निधीचे संचालन राज्यपाल कार्यालयातर्फे करण्यात यावे. पण एकही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे, अशी विनंती केली. राज्यपाल महोदयांनी यावर सुद्धा तत्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले.