Nagar | ज्ञानेश्वरच्या ऊस तोडणी मजुराच्या वारसाला तीन लाखाची मदत

नेवासा, (प्रतिनिधी) – येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या महिला ऊस तोडणी मजुराचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसाला कारखान्याकडून तीन लाख रुपये आर्थिक मदतीचा धनादेश कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते सुपूर्त करण्यात आला.
सिल्लोड येथील महिला ऊसतोड मजूर सरस्वती माधवराव मोटकर यांचा दि.२७ एप्रिल २०२३ रोजी अपघाती मृत्यू झाल्याने त्यांचे वारसदार पती माधवराव मोटकर यांना ३ लाख रुपयांचा धनादेश कारखान्याचे अध्यक्ष माजी आ.नरेंद्र घुले पाटील यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आ.पांडुरंग अभंग, संचालक अॅड देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, विठ्ठलराव लंघे, काशिनाथ नवले, काकासाहेब शिंदे, प्रा.नारायण म्हस्के, भाऊसाहेब कांगुणे, जनार्धन कदम, शिवाजी कोलते, मच्छिंद्र म्हस्के, बबनराव भुसारी,
सखाराम लव्हाळे, दीपक नन्नवरे, लक्ष्मण पावसे, विष्णू जगदाळे, दादासाहेब गंडाळ,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रवींद्र मोटे, कामगार संचालक सुखदेव फुलारी, अप्पासाहेब खरड, तांत्रिक सल्लागार एस.डी.चौधरी, एम.एस.मुरकुटे, शेतकी अधिकारी सुरेश आहेर, कल्याण म्हस्के, आप्पासाहेब बोडखे आदी उपस्थित होते.





