गुजरात किनारपट्टीजवळ हेलिकॉप्टर कोसळले; 3 क्रू मेंबर्स बेपत्ता
Updated On:

पोरबंदर : भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर गुजरात किनारपट्टीजवळ कोसळले. त्या दुर्घटनेनंतर हेलिकॉप्टरमधील ३ क्रू मेंबर्स बेपत्ता झाले. तर, त्यांच्या एका सहकाऱ्याला वाचवण्यात यश आले. पोरबंदरजवळून अरबी समुद्रातून प्रवास करणाऱ्या मालवाहू जहाजावरील एक कर्मचारी जखमी झाल्याची माहिती देण्यात आली.
त्यानंतर तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने सोमवारी रात्री बचाव कार्य हाती घेतले. दुर्दैवाने, ते हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले. त्या दुर्घटनेची माहिती समजताच तातडीने शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.
त्यामध्ये तटरक्षक दलाची ४ जहाजे आणि २ विमाने सहभागी झाली. दुर्घटना घडली त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये ४ क्रू मेंबर्स होते. त्यातील एकाला वाचवण्यात बचाव पथकांना यश आले. इतरांच्या शोधासाठी मंगळवारी उशीरापर्यंत मोहीम सुरू होती.





