Sanjay Raut : आज सकाळी उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर आता एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. त्यांना तातडीने मुंबईतील भांडुप इथल्या फोर्टिज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसापूर्वी संजय राऊत यांनी फोर्टिज रुग्णालयात रक्त तपासणी केली होती. अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. आज सकाळीच त्यांनी नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊतांनी आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणे गरजेचे असल्याची इच्छा राज ठाकरेंची आहे, असे सर्वांत मोठं विधान केले. त्यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. राज ठाकरेंची इच्छा; संजय राऊत म्हणाले… गेल्या कित्येक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची राजकीय युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. लवकरच हे दोन्ही भावांचे शिवसेना आणि मनसे पक्ष एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. तसे स्पष्ट संकेत दोन्ही पक्षातील नेत्यांनी दिले आहेत. मात्र, राज-उद्धव यांच्या राजकीय युतीच्या मुहूर्त कधी? या प्रश्नावर खल सुरू असतानाच संजय राऊतांनी राज ठाकरे यांनी व्यक्त केलेली इच्छा सांगितली. यामुळे मनसे महाविकास आघाडीसोबत जाणार? असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. प्रकृतीबाबत काय माहिती येणार? याकडे लक्ष संजय राऊत यांना अचानक रुग्णालयात का दाखल करण्यात आले. याचे नेमके कारण समोर आलेले नाही. यामुळे आता त्यांच्या प्रकृतीबाबत डॅाक्टर काय माहिती देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. हेही वाचा : निवडणुका होण्याअगोदरच एकनाथ शिंदेंना झटका! ‘या’ नगरपालिकेसाठी बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी अन् भाजपने टाकला मोठा डाव