इस्लामाबाद – पाकिस्तानातील एका माजी मंत्र्याच्या मुलाला हत्या प्रकरणी स्थानिक न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. सियालकोट जिल्ह्यातील जिल्हा सत्र न्यायालयाने पंजाब प्रांताचे माजी मंत्री अजमल चिमा यांचे पुत्र अहमद बिलाल चिमा यांला 2008 मध्ये 3 तृतीयपंथियांची हत्या केल्या प्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे.
सरकारी पक्षाच्यावतीने चिमा याच्याविरोधात सर्व साक्षीदार आणि पुरावे न्यायालयात सादर केल्यानंतर त्यांना या हत्यांसाटी दोषी ठरवण्यात आले आहे. मजहर हुसैन, अहमद शहजाद आणि अब्दुल जब्बार या तिघा तृतीयपंथीयांना सियालकटो येतील तचिमा यांच्या आऊट हाऊसमध्ये गोळ्या घालून मारण्यात आले होते.
या प्रकरणी अहमद चिमा यांना 4 हत्यांच्या आरोपात दोषी ठरवण्यात आले असून 5 लाख पाकिस्तानी रुपये प्रत्येक मयताच्या नातेवाईकांना भरपाई म्हणून देण्याची शिक्षाही न्यायालयाने सुनावली आहे. भरपाईची रक्कम जर देण्यात आली नाही तर आरोपीला सहा महिन्याच्या कारावासाची अतिरिक्त शिक्षाही बोगायला लागणार आहे.
Balochistan Terror Incidents : बलुचिस्तानातल्या दहशतवादी हल्ल्यात 6 पोलीस ठार तर 17 जण जखमी
चिमा यांनी या तिन्ही तृतीयपंथीयांना आपल्या आऊटहाऊसमध्ये डान्स पार्टीसाठी आमंत्रित केले होते. तेथे त्यांच्याकडून अयोग्य अपेक्षा केल्या गेल्या. त्याला .या तिगांनी नकार दिल्यावर त्यांना गोळ्या गालून ठार करण्यात आले होते.